Just another WordPress site

यावलमध्ये माणुसकीचे दर्शन : हरवलेला मोबाईल केला प्रामाणिकपणे परत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०५ जानेवारी २६ सोमवार

यावल येथील गोलू सलून कटिंग वाले यांचा मोबाईल हरवला असतांना सदर युवकाचा मोबाईल आज दि.०५ जानेवारी सोमवार रोजी हाफीज सब्दर पटेल रा.विरार नगर, यावल यांना यावल बस स्टँडच्या मागील परिसरात सापडला.सदरहू हाफीज सब्दर पटेल यांनी माणुसकीच्या नात्याने व प्रामाणिकपणाचे उदाहरण ठेवत तो मोबाईल संबंधित मालक गोलू कटिंग वाले यांना त्वरित परत केला.या घटनेमुळे यावल शहरात माणुसकीचे सुंदर दर्शन घडून आले आहे.

यावेळी पटेल बाबा यांनी सांगितले की,“ज्यांची वस्तू आपल्याला सापडते ती प्रत्येकाने परत केली पाहिजे.एखाद्या व्यक्तीची वस्तू हरवल्यावर होणारे दुःख आपण समजून घेतले पाहिजे.हरवलेली वस्तू परत मिळाल्यावर जो आनंद मिळतो तो खरा समाधान देणारा असतो.”मोबाईल परत मिळाल्यानंतर गोलू कटिंग वाले यांनी हाफीज सब्दर पटेल व.बशिर तडवी जळगाव जिल्हा प्रतिनिधी यांचे मनापासून आभार मानले.“शब्दात व्यक्त करता येणार नाही असे माणुसकीचे कार्य त्यांनी केले आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.हाफीज सब्दर पटेल यांनी वृद्ध वयातही दाखवलेली ही माणुसकी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.