डोंगर येथील जिल्हा परिषद शाळेत माजी मुख्याध्यापिका इंदू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शालेय साहित्य वाटप !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ जानेवारी २६ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज दि.०६ जानेवारी मंगळवार रोजी माजी मुख्याध्यापिका कै.सौ.इंदू प्रभाकर पाटील यांच्या जन्मशताब्दी दिनानिमीत्त त्यांचे सुपूत्र कुसुमाकर प्रभाकर पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन पॅड व पेन या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जिवनात हुरूप येण्याकरिता कुसुमाकर पाटील यांच्या सारख्या दात्यांची आजच्या घडीला नितांत गरज असल्याचे विशद केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,मनोहर झांबरे,जुम्मा तडवी,दिलीप तायडे, संजय बऱ्हाटे,शरीफा तडवी,उपशिक्षक शेखर तडवी,दाते कुसुमाकर पाटील यांची पत्नी उषा पाटील,डिगंबर पाटील,योगेश ठोंबरे,मुख्याध्यापीका विजया पाटील,उपशिक्षक दिनेश मराठे,मंगला चौधरी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्रकुमार झांबरे यांनी माजी मुख्याध्यापिका कै.इंदू पाटील यांच्या जीवनकार्या विषयी माहिती सांगीतली तर दाते कुसुमाकर पाटील यांनी त्यांच्या आई कै.इंदू पाटील यांच्या स्वभावगुण व कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक दिनेश मराठे यांनी केले तर आभार मंगला चौधरी यांनी मानले.