यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ जानेवारी २६ बुधवार
तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्यामंदिर विद्यालयात आज दि.०७ जानेवारी बुधवार रोजी माजी विद्यार्थी संघाची अधिकृत स्थापना करण्यात आली.यानिमित्त आयोजित सहविचार सभेत सर्वानुमते माजी विद्यार्थ्यांमधून संजय जहाबाज तडवी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दरम्यान नवनियुक्त अध्यक्षांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक आर.एम.भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.ए.पाटील यांनी केले व त्यांनी माजी विद्यार्थी संघाची भूमिका,उद्दिष्टे तसेच भावी कार्याचा सविस्तर आढावा उपस्थितां समोर मांडला.या विचारांनी प्रेरित होऊन माजी विद्यार्थिनी प्रमिला रामू कुरकुरे रा.खिरोदा, माहेर-चितोडा यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तूंसाठी एक हजार रुपये रोख देणगी दिली तसेच नवनियुक्त अध्यक्ष संजय तडवी यांनी तात्काळ क्रीडा विभागासाठी हवेचा पंप भेट म्हणून प्रदान केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक पी.एम.भंगाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन समन्वयक सतीश सरोदे (भाऊसाहेब) यांनी केले.माजी विद्यार्थी संघाची स्थापना अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडली.यावेळी शाळेविषयी आपुलकी व अभिमान असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास माजी विद्यार्थी,शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.