Just another WordPress site

यावल शहर वाहतुक पोलीसांनी केली विविध पन्नास बेशिस्त दुचाकी वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई !!

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०८ जानेवारी २६ गुरूवार

येथील वाहतुक पोलीस पथकाच्या वतीने दोन दिवसात झालेल्या विना क्रमांकाची वाहन व बेशिस्त वाहन धारकां विरुद्धच्या दंडात्मक कारवाईत पन्नास दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईत करण्यात आली आहे .

सदरची बेशिस्त व वाहतुकीचे नियम न पाडणाऱ्या वाहनधारकांवर होत असलेली कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या व फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या सुचना मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात ही वाहतुक सुरक्षा मोहीम राबविण्यात येत असुन,यावल येथील शहर पोलीसांच्या वाहतुक पथकाने केलेल्या धडक मोहीमेत यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार हेमंत सांगोळे,पोलीस कर्मचारी अरशद तडवी यांच्यासह पोलीस कर्मचारी सचिन पोळ,पोलीस कर्मचारी अनिल पाटील, पोलीस कर्मचारी मुकेश पाटील यांच्यासह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला .

Leave A Reply

Your email address will not be published.