Just another WordPress site

मध्य प्रदेशातील चैनपुरा येथे तीन दिवसीय आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलानाचे आयोजन !! संमेलनास उपस्थित राहण्याचे आदिवासी एकता परिषद  जिल्हा सचिव बी.आर.तडवी यांचे आवाहन !!

बुऱ्हानपुर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०८ जानेवारी २६ गुरुवार

आज सर्वात जास्त अन्याय हा विकासाच्या नावावर आदिवासी समाजाच्या जल,जंगल,जमीनीवर करून त्यांच्यवर सतत अन्यायच केला जात असून त्यांना नेहमी बेदखल करण्यात येत आहे.सदरहू सदरील ३३ व्या आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलानात सर्व आदिवासी बांधवांना एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडविण्यावर विचारविमर्श करण्यात येणार आहे.याकरिता दि.१३,१४,व १५ जानेवारी २०२६ रोजी आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलनाचे आयोजन चैनपुरा तहसील नेपानगर जि.बुऱ्हानपुर येथे करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी एकता परिषद  जिल्हा सचिव बी.आर.तडवी यांनी नुकतीच माहिती “पोलीस नायक ” शी बोलतांना दिली आहे.

दरम्यान सदर आदिवासी सांकृतिक एकता ऐतिहासिक महासंमेलानात राजस्थान,गोवा,गुजरात,दादरा-नगरहवेली अशा पर राज्य व इतर देशांतून आदिवासी बांधव या संमेलनात दरवर्षीप्रमाणे येत असतात तसेच महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी,हात मजूर,विद्यार्थी,तरुण युवक,कर्मचारी-अधिकारी आणि सर्व आदिवासी सामाजिक संघटना व सर्व आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे त्याचबरोबर यावल रावेर तालुक्यातील आदिवासी शेतकरी,हात मजूर,विद्यार्थी,तरुण युवक,कर्मचारी-अधिकारी आणि सर्व आदिवासी सामाजिक संघटना व सर्व आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे असे आव्हान आदिवासी एकता परिषद  जिल्हा सचिव तसेच आदिवासी सयाबाई ला.तडवी बहुउद्देशीय  संस्था संस्थापक डोंगर कठोरा ता.यावल बी.आर.तडवी रावेर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.