Just another WordPress site

यावल एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत राज्यस्तारिय क्रीडा स्पर्धत ४९ खेळाडूंनी वाजविला विजयाचा डंका !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० जानेवारी २६ शनिवार

येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी अमरावती (विदर्भ) येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयाचा डंका वाजवत यावल प्रकल्पाचे नाव राज्यात उंचाविले आहे.राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यावल प्रकल्पाचे सहभागी ५० खेळाडूंपैकी ४९ खेळाडूंनी घवघवीत सुयश प्राप्त केले आहे.यावल प्रकल्पाने वैयक्तिक क्रीडा प्रकारात सर्वाधिक २२ मेडल व सांघिक क्रीडा प्रकारात ४ ट्रॉफी पटकाविल्या आहेत.नाशिक विभागाने मिळविलेल्या ५२४ गुणांकनामध्ये यावल प्रकल्पाने सर्वाधिक ११८ गुणांची भागिदारी केली आहे.

दरम्यान आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा,यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यावल प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील व संदीप पाटील यांच्या देखरेखीखाली यावल प्रकल्पातील क्रीडा शिक्षक यांनी राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा परिपूर्ण सराव करून घेतल्यामुळे हे यश साध्य झाले आहे.यावल प्रकल्पाचा १४ वर्षे आतील मुलांचा खो खो संघ राज्यस्तरावर अजिंक्य ठरला तर १७ वर्षे आतील मुलांच्या संघाने ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला.याशिवाय १००,२००,४००,८०० मीटर धावणे,५००० मीटर चालणे,लांब उडी,उंच उडी,थाळी फेक,भाला फेक या विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारात देखील यावल प्रकल्पाने राज्य स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला तसेच १७ व १९ वर्षे आतील मुलांच्या संघाने ४ बाय ४०० रिलेमध्ये राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला.प्रसंगी यावल प्रकल्पाचा पिंगलाल दयाराम पावरा या खेळाडूला उत्कृष्ट धावपटू म्हणून आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त आयुषी सिंग यांच्याकडून सायकल बक्षिस म्हणून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.