यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ जानेवारी २६ सोमवार
येथील शहरातील शेख कुटूंबीयांचे पुढाकाराने सामाजिक बांधिलकीतुन जुन्या रूढी परंपरांना फाटा देत साखर पुडयाचे आदर्श लग्न सोहळ्यात रूपांतर लावुन घेतल्याने शेख कुटूंबीयांचे सर्वत्र कौत्तुक होत आहे.समाजाने देखील याचे अनुकरण करावे अशी अपेक्षा साध्या पध्दीतीने संपन्न झालेल्या लग्नसोहळ्यात वधु वरच्या मंडळीकडून व्यक्त करण्यात येत होती.
सद्या सर्वत्र लग्न सोहळ्यांची धुम सुरू असुन लग्न सोहळयांना येणाऱ्या पाहूण्यांची गर्दी दिसत असतांना काल दि.११ जानेवारी २६ रविवार रोजी यावल येथील फालक नगर परिसरात पहूर पाळधी तालुका जळगाव येथे शेख कुटुंबीय आणी यावलचे खान कुंटूबीयांनी आपल्या मुलीच्या लग्नसोहळास लागणारा अनाठाई खर्च व वेळ वाचविण्यासाठी कन्येचा साखरपुडयातच लग्न उरकवण्याचा निर्णय दोघकुंटूबी यांच्या संमतीने घेतला.पहुर पाळधी येथील रहिवासी मुलाचे वडील जहीर खान आणि मुलीचे वडील यावल येथील राहणारे आसिफ खान ईकबाल खान यांच्यासह वधु व वराच्या दोघ मंडळी यात प्रामुखाने समिर खान बिल्डर,आसीफ शेख,मजीद शेख रशीद शेख,पप्पु शेख बिल्डर,अफजल वायरमन आणि वधु वराच्या कुटुंबीयांनी घेतला.यावलचे मौलाना सामिउल्ला कादरी यांच्या उपस्थित कन्या हूरेन फोतेमा आणी अजहर शेख यांचा आदर्श विवाह पार पडला.या विवाहमुळे समाजाने सादगी,सुज्ञता आणि सामाजिक जाणीवतेचा आदर्श घालुन दिला असुन समाजातील ईतर कुटुंबीयांनी देखील या कृतीतुन प्रेरणा मिळण्यासाठी बाब आहे.