यावल नगरपालीका उपनगराध्यक्षपदी सईदाबी शेख तर स्विकृत सदस्यपदी अतुल पाटील व उमाकांत फेगडे यांची निवड !!
यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जानेवारी २६ गुरुवार
येथील नगरपालीकेच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीतील काँग्रेस गटाच्या सईदाबी शेख याकुब यांची तर स्विकृत सदस्यपदी महाविकास आघाडीचे अतुल वसंत पाटील व भारतीय जनता पक्षाच्या गटातुन उमाकात रेवा फेगडे यांची निवड करण्यात आली आहे.आज दि.१५ जानेवारी रोजी यावल नगरपालीकेच्या सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छाया अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली व या नगरपालीकेच्या पहील्या सर्वसाधारण सभेत सर्व २३ नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी सभेत उपनगराध्यक्षपदाच्या निवडी करीता राष्ट्रवादी (अ प) गटाचे अंजुम बी कदीर खान यांना ४ मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या उप नगराध्यक्षपदासाठी रूबाब महमंद तडवी यांना ८ मते मिळाली तर महाविकास आघाडी काँग्रेसच्या सईदाबी शेख मोहम्मद याकुब यांना १२ मते मिळाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.या सर्वसाधारण सभेचे कामकाज मुख्यधिकारी निशीकांत गवई व सहमुख्यधिकारी रविकांत डांगे यांनी निवडणुक प्रक्रीयेचे काम पाहीले.प्रसंगी नगरसेवकांची निवड झाल्यावर पदाधिकाऱ्यांनी सभागृहाच्याबाहेर घोषणाबाजीने एकच जल्लोष केला.