Just another WordPress site

“एकत्र यायचे असेल तर सत्तेतून बाहेर पडा” !! काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते उत्तम जानकर यांचे मोठे वक्तव्य !!

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ जानेवारी २६ सोमवार

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे व त्यामुळे राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग आला आहे.तसेच या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे कारण मागच्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते उत्तम जानकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही
राष्ट्रवादीच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.”एकत्र यायचे असेल तर सत्तेतून बाहेर पडा” असे वक्तव्य उत्तम जानकर यांनी अजित पवारांना उद्देशून केले आहे.महापालिका निवडणुकीनंतर आता झेडपीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे का ? या प्रश्नावर बोलतांना उत्तम जानकर म्हणाले की,मला याबाबत माहिती नाही मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे मला वाटत नाही कारण शरद पवार यांचा विचार वेगळा आहे आणि आता अजित पवार हे सत्तेबरोबर आहेत त्यामुळे बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल की नाही ? मला माहिती नाही.अजित पवारांना कुठला तरी एक निर्णय घ्यावा लागेल म्हणजे सत्तेतून बाहेर तरी
पडावे लागेल आता उद्या काय घडेल हे माहिती नाही पण शरद पवार यांचा जो विचार आहे तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत असे उत्तम जानकर माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.

“एकत्र यायचे असेल तर सत्तेतून बाहेर पडावे लागेल आणि शरद पवार यांच्या विचाराने पुढे जावे लागेल.काहीतरी धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही व त्यासाठी विचार असावा लागतो.मग कोणताही पक्ष असू द्या.भारतीय जनता पक्षाचाही हिंदुत्व हा विचार आहे,शिवसेनेचाही हिंदुत्व हा विचार आहे तसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुरोगामी हा विचार आहे.तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असतांनाच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठे वक्तव्य केले असून माझे वैयक्तिक मत असे आहे की,मग कुठलीही आघाडी असो फक्त आमच्या पक्षाचीच नाही तर कोणतीही आघाडी असली तरी चिन्ह हे एकच असले पाहिजे असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत आमच्या पक्षाचे अध्यक्ष
अजित पवार हे योग्य तो निर्णय घेतील.काय होते की निवडणुकीत ग्रामीण भागातील अनेक लोकांचा मतदान करतांना चिन्हावरून गोंधळ होतो मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा अजित पवार यांचा आहे असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.