Just another WordPress site

दहिगाव शाळेच्या गेट व संरक्षण भिंतीच्या चार वर्षापासुनच्या अपुर्ण अवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) या : –

दि.०३ फेब्रुवारी २६ मंगळवार

तालूक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेचे संबधीत ठेकेदाराने चार वर्षापूर्वी अपुर्ण अवस्थेत सोडलेल्या कामांमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात येत असुन पंचायत समितीच्या शिक्षण विभाग प्रशासनाने विद्यार्थ्याशी निगडीत या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकवर्गाकडून करण्यात येत असुन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

या संदर्भात दहिगाव उर्दू शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने समिती अध्यक्ष जफर खान पठाण व सचिव शेख कुदबुद्दीन यांच्या वतीने यावल पंचायत समितीच्या गटाविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांना देण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषदच्या ऊर्दू शाळेचे शासनाच्या व ग्राम पंचायत दहिगावच्या माध्यमातुन २०२०-२१ या वर्षात करण्यात आले आहेत.दरम्यान सदर संरक्षण भिंत (कम्पाऊंड वॉल )आणी शाळेच्या प्रवेश व्दाराचे काम संबधीत अपुर्ण अवस्थेत सोडण्यात आले असून याबाबत पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रारी करून देखील काहीही उपयोग होत नसल्याची संत्पत भावना विद्यार्थी पालकवर्गात येत आहे.सद्यस्थितीला जळगाव जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या दुदैवी प्रसंगामुळे पालक वर्गात आपल्या पाल्यांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.