Just another WordPress site

चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ‘एनईपी २०२० अंमलबजावणीतील अग्रणी’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-

दि.०४ फेब्रुवारी २६ बुधवार

सी.बी.एस.ई.बोर्डाशी संलग्न असलेल्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चोपडा या शाळेला CED फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘NEP–2020 अंमलबजावणीतील अग्रणी पंचतारांकित पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात भारत सरकार च्या शिक्षण मंत्रालयाच्या NIOS चे उपसंचालक अलोक कुमार गुप्ता,नोएडा फिल्म सिटीचे संस्थापक डॉ.संदीप मारवा व प्रियदर्शी नायक यांच्या हस्ते पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी दिपाली पंकज बोरोले व प्राचार्य मिलिंद भाऊराव पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी देशभरातील सुमारे २९००० सीबीएसई शाळांमधून शेकडो शाळांची निवड प्रक्रिया घेण्यात आली व त्यातून पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चोपडा या स्कूलची निवड करण्यात आली.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० (NEP-2020) ची काटेकोर अंमलबजावणी,विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे या शाळेने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.या शाळेत आधुनिक शिक्षणाची सांगड घालत AI Learning (कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित शिक्षण)अत्याधुनिक Space Lab तसेच Robotics Lab च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,संशोधन वृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास केला जात आहे.भविष्यातील शिक्षणाच्या गरजा ओळखून राबविण्यात येणारे हे उपक्रम एनईपी–२०२० च्या उद्दिष्टांशी पूर्णतः सुसंगत आहेत पंकज स्कूलचे प्राचार्य मिलिंद भाऊराव पाटील हे उंटावद येथील माजी सरपंच स्व.भाऊराव हरी पाटील यांचे लहान सुपुत्र असून ते अतिशय शिस्तप्रिय व सतत आपल्या कामाला प्राधान्य देणारे आहेत. पंकज स्कूलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश पंडित बोरोले,अध्यक्ष पंकज बोरोले,उपाध्यक्ष अविनाश राणे,संचालक नारायण बोरोले, गोकुळ भोळे,प्राचार्य मिलिंद पाटील व संपूर्ण शिक्षक वृंद,पालकवर्ग व शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.