Just another WordPress site

डोंगर कठोरा येथील अ.ध.चौधरी विद्यालयातील पूनम व आम्रपाली आढाळे या दोन्ही बहिणींनी “गांधी विचार संस्कार” परीक्षेत पटकाविले सिल्वर मेडल !!

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२५-२६ सहभागी शाळा अंतर्गत दोन्ही बहिणींनी मिळविला जिल्ह्यातून दुसरा क्रमांक !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ फेब्रुवारी २६ बुधवार

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२५-२६ सहभागी शाळा अंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा १ मध्ये पुरस्कार प्राप्त असलेल्या तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अ.ध.चौधरी विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये “गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२५-२६” अंतर्गत गांधी संस्कार परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले होते.सदरील गांधी विचार संस्कार परीक्षा-२०२५ हि संपूर्ण जिल्ह्याभरातील शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती हे विशेष !.सदरहू “गांधी विचार संस्कार परीक्षा-२०२५” या परीक्षेत इयत्ता ११ वीतील विद्यार्थिनी नामे पूनम बाळू आढाळे हिने मोठ्या गटातून व इयत्ता ६ वीतील विद्यार्थिनी नामे आम्रपाली बाळू आढाळे या दोन्ही बहिणी जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाने पास झालेल्या आहेत.

सदर परीक्षेमध्ये विद्यालयाचे ५ वी ते १२ वीच्या एकूण १०९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.दरम्यान या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये ११ वी व १२ वीच्या गटात जिल्ह्यात दुसरा अ.ध.चौधरी विद्यालय व जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी पुनम बाळू आढाळे हिला सिल्वर मेडल व प्रमाणपत्र तसेच ५ वी ते ७ वीच्या गटात देखील जिल्ह्यात दुसरा आम्रपाली बाळू आढाळे हिला सिल्वर मेडल तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक रसिका प्रवीण पाटील हिला ब्राझ मेडल देऊन गौरविण्यात आले आहे.दरम्यान गुणगौरव सोहळा व प्रमाणपत्र वितरण” कार्यक्रमात आज दि.०४ फेब्रुवारी २६ बुधवार रोजी पूनम आढाळे व आम्रपाली आढाळे यांना सिल्व्हर मेडल व लहान गटातून जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळविलेल्या रसिका पाटील यांना ब्रांझ मेडल व प्रमाणपत्र तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सदरहू शाळेतील एका छोटेखाने कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक नितीन झांबरे यांच्या हस्ते सदरील मेडल व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक नितीन झांबरे यांच्या समवेत प्रा एन व्ही वळींकार,प्रा रामेश्वर जानकर,प्रा नयना पाटील,उपशिक्षक आर पी चिमणकारे.पी पी कुयटे,विवेक कुलट,मनीषा तडवी,शुभांगीनी नारखेडे,सोनाली फेगडे,चेतन चौधरी,सचिन भंगाळे,क्लार्क ठकसेन राणे,ग्रंथपाल योगेश राणे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.