Just another WordPress site

महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला तर गुजरातमध्ये?पंतप्रधानांनी लक्ष देण्याची गरज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्पष्ट भुमिका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला तर तो गुजरातमध्ये गेला.पण पहिल्यापासून माझे मत एकच आहे पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशाच्या बाबतीत प्रत्येक राज्य हे त्यांच्यासमान मुलांसारखे असले पाहिजे.उद्या समजा महाराष्ट्रातला हा प्रकल्प बाहेर गेला असता आणि समजा तो आसामला गेला असता तर मला वाईट वाटले नसते.प्रकल्प गुजरातला गेला म्हणजे तो शेवटी देशातच आहे ना?असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.वाईट या गोष्टीचे वाटते की,जो प्रकल्प महाराष्ट्रात येतोय आणि जो बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय म्हणूनच पंतप्रधानांनी स्वतः याकडे लक्ष देण्याची गरज आहे.प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखे काय आहे.पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो संपूर्ण देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठे झाले पाहिजे प्रत्येक राज्यात उद्योग धंदे आले पाहिजेत.तिथल्या लोकांना तिथून आपले घर सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याची आणि तिकडच्या लोकांना त्यांचे ओझे बनण्याची आवश्यकता नाही असे प्रकल्प समजा प्रत्येक राज्यात गेले तर देशाचाच विकास होईल असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रकल्पांसाठी ज्या सवलती आणि प्रशासकीय सुविधा आहेत त्यांच्यासाठी फक्त गुजरातमध्येच पायाभूत सुविधा आहेत असे नाही.तामिळनाडू,कर्नाटकात आहे आणि इतर राज्यातही आहे अजूनही महाराष्ट्र हे राज्य उद्योगधंद्याच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहे असे राज ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.