Just another WordPress site

सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलीनकरण करावेच लागेल !! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचे विधान !!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाचा चेंडू आता सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०७ फेब्रुवारी २६ शनिवार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटात संभ्रमाचे वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट यांचे विलीनीकरण होणार की नाही ? हा मुद्दा कळीचा बनला असून दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचे महत्त्वाचे विधान समोर आले असून आज जिल्हा परिषदेसाठी मतदान केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला.“तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद निवडणूक होत असल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे व या निवडणुकीत नागरिकांकडून अजितदादांबद्दल सहानुभूती व्यक्त केली जाईल” अशी अपेक्षा हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.तर हसन मुश्रीफ विलीनीकरणाच्या विषयाबाबत बोलतांना म्हणाले की,अजित पवार यांच्या पातळीवर विलीनीकरणाची चर्चा सुरू असेल तर त्याबाबत आम्हाला अधिक माहिती नाही पण सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबाची विलीनीकरणाची भूमिका असेल तर त्याबाबत निर्णय घेतला जाईल.सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलीनकरण करावेच लागेल असेही हसन मुश्रीफ म्हणाले.

अजित पवार यांच्या निधनाबाबत बोलतांना हसन मुश्रीफ म्हणाले,अजित पवारांचे निधनाचे वृत्त आमच्यावर अणुबॉम्ब पडावे असे कोसळले.अजित पवार यांच्या अपघाताबाबत जे कोण शंका उपस्थित करत आहेत त्या सर्वांच्या शंकांवर चौकशी होणे हाच उपाय आहे व दुसरा कोणताही  त्यातून मार्ग दिसत नाही.तसेच अजित पवार यांचा ज्यादिवशी अपघात झाला त्यानंतर पवार कुटुंबियांचीच इच्छा होती की,त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी व्हावा.पवार घराणे पुरोगामी असल्यामुळे ते निधनाच्या तीन दिवसात सर्व विधी आटोपतात व त्यामुळे तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली.प्रफुल पटेल हे अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्याबरोबर काम करत आहेत.तर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे विधिमंडळाची बैठक कुणी बोलवायची ? ती भूमिका दुर्दैवाने तटकरे,पटेल यांनाच भूमिका बजावावी लागणार होती त्यामुळे त्यांना व्हिलन करण्याचा प्रयत्न अनाकलनीय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.