आमदार अमोल जावळे यांची यावल पंचायत समितीच्या अचानक भेटची व सिईओ कडील तक्रार शहरात बनली चर्चेचा विषय !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० फेब्रुवारी २६ शुक्रवार
येथील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या गटविकास अधिकारी यांच्या बेशिस्त व भ्रष्ठ कारभाराविषयी असंख्य तक्रारीच्या पार्श्वभुमीवर आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांनी नुकतीच थेट यावल पंचायत समितीला अचानक भेट दिली होती.सदर भेटी दरम्यान अधिकारी गैरहजर राहात असल्याबाबत सिईओ मिनल करनवाल यांच्याकडे केलेल्या तक्रारीचे काय झाले ? असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नगरीकांमध्ये चर्चेला जात आहे.
रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांनी तिन दिवसापुर्वी यावल पंचायत समिती च्या सर्व विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचाराच्या व अधिकाऱ्यांच्या बेशिस्तीबाबत नागरीकांच्या असंख्य तक्रारी असल्याने अखेर आमदार अमोल जावळे यांनी पंचायत समिती च्या कार्यालयास आपल्या नेहमीच कार्य शेलीत अचानक भेट दिली व कामकाजाची माहिती घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता.दरम्यान आमदारांनी पंचायत समितीत दिलेल्या अचानकच्या भेटीत त्यांना गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांच्यासह अनेक अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याचे दिसुन आल्याने आमदारांनी यांनी संत्पत भावना व्यक्त करीत गटविकास अधिकारी यांच्याविषयी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली.दरम्यान यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या व त्यांच्या काही विश्वासातले सहकारी अधिकारी यांच्या विषयी देखील दोन वेळा पंचायत समितीच्या सभागृहात रावेर आणि चोपडा या दोघ मतदारसंघाचे आमदार व खासदार व सिईओ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आमसभेत गटविकास अधिकारी यांच्या विरूद्ध असंख्य तक्रारींचा पाढाच ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी वाचुन दाखवला होता व असे असतांना देखील गटविकास अधिकारी यांची साधी बदली सुद्धा झाली नसल्याची संत्पत भावना ग्रामस्थ मंडळी मध्ये व्यक्त करण्यात आली होती.दरम्यान तिन दिवसापुर्वी आमदार अमोल जावळे यांनी पंचायत समितीला दिलेल्या भेटीनंतर बेशिस्त व भ्रष्ठ अधिकारी यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होईल या प्रश्नाकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.