Just another WordPress site

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाईसाठी पोलीसांना निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० फेब्रुवारी २६ शुक्रवार

यावल पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर कर्तव्य बजावत असतांना झालेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असुन या संदर्भात यावल पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने फैजपुर विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांना नुकतेच लेखी निवेदन आले आहे.शासकीय कर्मचारी असलेल्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर जिवघेणा हल्ला करून धमकावल्याचा आरोप करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या संदर्भात पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमुद केल्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी डिगंबर गजानन चौधरी,कनिष्ठ लिपिक राहणार सावदा तालुका रावेर हे दि. ५ फेब्रुवारी २६ रोजी खेडाखरेदी फिरस्तीच्या कामांवर नियुक्त होते व कर्तव्य बजावत असतांना बाजार समितीचे लायसन्सधारक व्यापारी बाळू भास्कर तेली व त्यांचा मुलगा ज्ञानेश्रर बाळू तेली राहणार पाडळसा तालुका यावल यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामवर येवुन टोकन द्या असे सांगुन चौधरी यांना बोलावले.डिगंबर चौधरी हे गोदामावर टोकन देण्यासाठी गेले असता संबधित व्यापारी व त्याचा मुलगा तसेच गोदामावरील हमाल व त्याचे नातलग अशा १५ ते १६ जणांनी संगनमतानी कट रचुन लाठ्या-काठया आणी लाथ्या बुक्यांनी जबर मारहाण करीत चौधरी यांना गंभीर जख्मी केले.या घटने प्रकरणी संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे मात्र मारहाणनंतर ही आरोपींकड्रन यापुढे आमच्या गाडयांवर लक्ष ठेवल्यास तुला पाहून घेतले जाईल अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन दैनंदिन काम करणे कठीण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री (विकास व विपणन) अधिनियम १९६३ मधील कलम ५९ (ब) नुसार बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे बंधकारक असल्याचे निदर्शनास आणुन देण्यात आले.या घटनेशी संबंधीत व्यापारी आणी मारहाणीत सहभागी १५ ते १६ व्यक्तींवर कायद्याशीर कठोर कारवाई करून योग्य शासन करावे अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव,सहाय्यक सचिव,लेखपाल,निरिक्षक,लिपिक,संगणक परिचारक व शिपाई वर्गातील एकूण १५ कर्मचारी यांनी एकत्रीतपणे या घटनेचा निषेध नोंदविला असुन या प्रकरणाची गंभीरता लक्षात पोलीस प्रशासनाने कडून कोणते ठोस पाऊल उचले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.