Just another WordPress site

मार्केट फी व व्यापाऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मुद्यावरून व्यापाऱ्यांचे धान्य खरेदी बंद आंदोलनाचा इशारा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० फेब्रुवारी २६ शुक्रवार

स्थानिक यावल कृषी बाजार समितीच्या माध्यमातुन आकारण्यात येणाऱ्या मार्केट फीच्या त्रासामुळे तसेच काल ज्ञानेश्वर बाळू तेली व अन्य व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या पोलीसात दाखल केलेला गुन्हा मागे न घेतल्यास व्यापाऱ्यां मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत यावल तालुका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्व व्यापारी बांधूंना याबाबत कळविण्यात आले असून सध्या व्यापाऱ्यांच्या वतीने धान्य खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यापारी संघटनेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की,मार्केट फी व अवाजवी वाहन फी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्यात यावी तसेच व्यापाऱ्यांवर दाखल केलेले पोलीसातील गुन्हे मागे घेण्यात यावे तसे न झाल्यास व्यापाऱ्यांकडून धान्य खरेदी बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.व्यापारी असोसिएशनने स्पष्ट केले आहे की,जोपर्यंत मार्केट फी आणि वाहन शुल्क कमी होत नाही तोपर्यंत खरेदी बंद राहणार आहे.तसेच कोणत्याही व्यापाऱ्याने या निर्णयाचे उल्लंघन करून माल खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्या कडून व्यापारी असोसिएशन समितीकडे १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.या निर्णयामुळे शेतकरी व बाजार व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.