यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ फेब्रुवारी २६ गुरुवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाची एक दिवसीय औद्योगिक सहल भेट (इंडस्ट्रियल व्हिजिट) वाघोदा ता.यावल येथील “न्यू इरा एडिसिव्ह” या ठिकाणी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली.
यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विलासभाऊ जैन यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न व अडचणी यांच्यावर चर्चा करून मार्गदर्शन केले व पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सहली दरम्यान क्वालिटी मॅनेजर श्रीकांत मोरे यांनी तयार होणाऱ्या उत्पादनासाठी लागणाऱ्या विविध पदार्थांचे कोणकोणते रासायनिक गुणधर्म तपासले जातात याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच विद्यार्थ्यांच्या मनात उद्भवलेल्या विविध प्रश्नांची सविस्तर माहिती व उत्तरे दिली.यावेळी वेगवेगळ्या विभागानुसार विद्यार्थ्यांनी माहिती ऐकून संग्रहित केली.यावेळी व्यवस्थापक विलास कुंभार यांनी तयार होणाऱ्या सोल्युशन तसेच त्यासाठी लागणारे पदार्थांचे प्रमाण,पॅकेजिंग तसेच हॉलमार्क व क्षमता याबाबत विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती दिली.अकाउंटंट पारस जैन व सुपरवायझर भूषण बावस्कर यांनीही आपापल्या विभागातील विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.सर्व विद्यार्थ्यांनी माहिती ऐकून प्रोत्साहित झाले.सदर सहलीचे आयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम डी खैरनार,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर डी पवार व प्रा.आर एस शिरसाठ यांनी केले.