Just another WordPress site

नाफेड हरभरा खरेदी नोंदणी अंतर्गत हमीभावाची संधी मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी सज्ज राहावे-राकेश फेगडे यांचे आवाहन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ फेब्रुवारी २६ बुधवार

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत नाफेडमार्फत २०२६ च्या रब्बी हंगामात हरभरा खरेदी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून शेतकरी बांधवांनी ही सुवर्णसंधी सोडू नये.तसेच शासनाकडुन आदेश आल्यानंतर लगेच यावल खरेदी केंद्र कोरपावली वि.का.सोसायटी येथे आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून शासन योजनेच्या हमी भाव संधीचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी साठी सज्ज राहावे असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन राकेश वसंत फेगडे यांचेकडुन करण्यात आले आहे.

दरम्यान या योजनेअंतर्गत हरभऱ्याला प्रति क्वींटल ५८७५ रुपये हमीभाव मिळेल ज्यामुळे बाजारातील अस्थिर भावांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होईल.सदर नोंदणीसाठी आधारकार्ड,सातबारा उतारा,पीकपेरा,आधार लिंक्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर आवश्यक आहेत.सदरील नोंदणी प्रक्रिया साधी आणि पारदर्शक असून ऑनलाइन पोर्टलद्वारेही सुविधा उपलब्ध आहे.या नोंदणीचे शेतकऱ्यांसाठी फायदे पुढीलप्रमाणे आहेत.यात हमीभाव हमी: बाजार भावापेक्षा जास्त किंमत मिळेल.सहज नोंदणी:केंद्र किंवा eSamriddhi App मोबाईल ॲपवरून घरी बसून नोंदणी.त्वरित मोबदला:विक्रीनंतर थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी २०२६ हरभरा हंगामाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज रहावे व अधिक माहितीसाठी कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.