Just another WordPress site

आदिवासी एकता मंच महाराष्ट्र संघटना नवीन कार्यकारणी जाहीर !! जिल्हाध्यक्षपदी मेहरबान तडवी यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ फेब्रुवारी २६ बुधवार

आदिवासी समाजाच्या हितासाठी व न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी संघर्ष व लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या आदिवासी एकता मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेची यावल येथे लोकेशनगरमध्ये बैठक संपन्न होवुन नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली व विविध सामाजीक विषयांवर चर्चा करण्यात आली.तसेच आदिवासी एकता मंच राज्य अध्यक्ष एम बी तडवी व राज्य उपाध्यक्ष सलीम भुरेखा,राज्य सचिव इब्राहिम तडवी तसेच राज्य सदस्य जहांगीर तडवी यांच्या उपस्थितीत व राज्य महानिरीक्षक म्हणून मनीष तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.१८ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर चोपडा मुक्ताईनगर व जळगाव जिल्हा यांची नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन यामध्ये मेहरबान तडवी यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

उर्वरित कार्यकारणीत किनगाव येथील सबदल तडवी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी,फरीद तडवी मोहरद यांची उपाध्यक्षपदी,पाल येथील सलीम तडवी यांची जिल्हा संघटक तसेच यावल तालुका अध्यक्षपदी नायगाव येथील युसूफ तडवी त्यांची निवड झाली.चोपडा तालुका अध्यक्षपदी वसीम तडवी (धानोरा),रावेर तालुका अध्यक्षपदी जीन्स येथील लतिफ तडवी,जिल्हा सचिवपदी चिंचाळे येथील फतू रज्जाक तडवी,जिल्हा सहसचिव पदी भालोद येथील जुम्मा तडवी,जिल्हा सदस्यपदी एरंडोल येथील वसीम तडवी,यावल शहराध्यक्षपदी शाहरुख तडवी,यावल तालुका उपाध्यक्षपदी फिरोज तडवी,याकूब तडवी (अकलूज),रावेर तालुका उपाध्यक्षपदी जाबीर तडवी,यावल तालुका सदस्यपदी दगडू तडवी तसेच रहीम तडवी व पीरन तडवी,आडगाव शाखा अध्यक्षपदी मज्जित तडवी,वाघझिरा शाखा अध्यक्षपदी किरण तडवी या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली.सदरहू सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड झाल्याबद्दल उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांनी वड्री तालुका यावल येथे या वर्षाचा समाज मेळावा घ्यावा याबद्दल प्रस्ताव मांडला व सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याला एकमताने मंजूर केले.सदर मेळावा ईदनंतर लगेचच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी होणार आहे असे जाहीर केले.आज बऱ्याच मान्यवरांनी आदिवासी एकता मंचमध्ये प्रवेश केल्याने त्या सर्वांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.या सभेत जिल्हा उपाध्यक्ष संजू तडवी,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रशीद तडवी,यावल माजी तालुका अध्यक्ष अशपाक तडवी,जिल्हा सदस्य सचिन तडवी, अकबर तडवी सेवानिवृत्त टी.सी जळगाव,बाबू तडवी जळगाव जिल्हा सदस्य कुर्बान तडवी,जिनसी अकबर तडवी सलमान तडवी जिल्हा सदस्य भुसावळ तसेच महिला जिल्हा अध्यक्ष मुन्ना तडवी जिल्हा उपाध्यक्ष रेहाना तडवी जिल्हा सचिव सामना तडवी,यावल तालुका अध्यक्ष जुबेदा तडवी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.विशेष निरीक्षक म्हणून पत्रकार मासूम तडवी,पत्रकार फिरोज तडवी हे उपस्थित होते.सर्व सर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध व एकमेकांना झाल्याने सर्व पदाधिकांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले व निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी जिल्हाध्यक्ष सलीम तडवी तसेच माजी सर्व जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी यांनी निवडलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.