Just another WordPress site

किनगाव निवासी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ फेब्रुवारी २६ गुरुवार

तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये “सौभाग्यवती भव” अंतर्गत हळदी कुंकू कार्येक्रमासह विविध कार्यक्रम उत्साहात सम्पन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व.केतनदादा मल्टी पर्पज फाउंडेशनच्या संचालिक पूनम मनिष पाटील व पुष्पा पाटील मंचावर उपस्थित होत्या.

या कार्येक्रमाच्या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक व शालेय समितीचे घनिष्ठ नाते निर्माण करणे जेणेकरून ते विद्यार्थ्यांचा प्रगतीस उपयोगी ठरू शकते तसेच संसाररुपी गाडी ओढताना स्त्रि गुण लुप्त होताना दिसून येतात त्यांच्या अंगी असलेल्या गुणांनाही वाव मिळावा व आप आपसात विचारांची देवान घेवान करुण आपल्या पाल्याचा शैक्षणीक विकास साधता यावा यासर्व बाबींचा विचार करुन पुनम पाटील या दरवर्षी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासह महिलांना एकत्रीत आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.या कार्यक्रमात महिलांचे हळदी कुंकूवाने स्वागत करण्यात आले तर विविध खेळाचे आयोजनही करण्यात आले होते त्यात फुगे फोडणे, लंगडी,तळ्यात मळ्यात,लाव्हा-वाल्क म्हणजे पाया खाली ठेवलेल्या पुठ्ठ्याला हाताच्या साह्याने एक पाऊल पुढे टाकून तो पुठ्ठा दुसऱ्या पायाखाली घेणे आणि ध्येयापर्यंत पोहोचणे इ.सह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या महिलांना आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आलेली होती तर उर्वरीत सर्व महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली तसेच महिलांना हळदी कुंकवाचे वाण म्हणून आकर्षक अशा पर्स देखील भेटवस्तूच्या साह्याने देण्यात आल्या.या संपुर्ण कार्यक्रमाचा सर्व महिलांनी मनसोक्त आनंद घेत इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल व स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका पुनम मनिष पाटील यांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिलोत्तमा महाजन व राजश्री अहिराव यांनी केले तर भावना चोपडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगिता बिहारी,देवयानी साळुंखे,सोनाली कासार,भावना चोपडे,राजश्री अहिरराव,तिलोत्तमा महाजन,सोनाली पाटील,प्रतिभा पाटील,योगिता सावळे,वैशाली मराठे,हर्षदा पाटील, नूतन देशमुख,सोनाली वाणी,पूनम कोळी व रोहिणी झाल्टे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.