तुस्सी ग्रेट हो …….खिताबांचा महामेरू डॉ डिगंबर तायडे यांची खिताब जिंकण्याची शर्यत सुरूच !! डॉ तायडे दाम्पत्याचा वाजतोय भारतासह परदेशात डंका !!
अमेरिके कडून "अब्राहम लिंकन ग्लोबल एक्सलंट पुरस्कार २०२६" देऊन अमेरीकन बुक ॲाफ वर्ल्ड रेकार्ड नोंद !!
बाळासाहेब आढाळे,मुख्य संपादक
पोलीस नायक न्यूज पेपर
दि.२० फेब्रुवारी २६ शुक्रवार
आपल्या दैदिप्यमान कामगिरीतून एकामागून एक खिताब आपल्या शिरपेचात रोवणारी जोडगोडी डॉ डिगंबर तायडे व शकुंतला तायडे या दाम्पत्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखत एकामागून एक खिताब मिळवीत भारतातच नव्हे तर परदेशात देखील आपली छाप सोडण्यास यशस्वी ठरली आहे.यात डॉ दिगंबर तायडे यांना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकतर्फे “अब्राहम लिंकन ग्लोबल एक्सलंट पुरस्कार २०२६” पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.परिणामी भारतात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत डॉ डिगंबर तायडे यांनी आतापर्यंत ११७ खिताब आपल्या नावावर कोरून भारतातच नव्हे तर जगात आपला नावलौकिक मिळविला आहे व भरीसभर म्हणून डॉ डिगंबर तायडे यांनी आपले नाव आता परदेशात देखील खिताबांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी कोरले आहे हे विशेष !.सदरहू सदरील पुरस्कार प्राप्त करीत असतांना डॉ डिगंबर तायडे यांना खंबीर साथ मिळत आहे ती त्यांची अर्धांगिनी सौ शकुंतला तायडे यांची.परिणामी डॉ डिगंबर तायडे व त्यांच्या पत्नी शकुंतला तायडे हि गाड्याची दोन चाके अविरत पणे आपल्या यशात मार्गक्रमण करीत आहेत हि बाब त्यांना यशोशिखरावर जाण्यास सार्थ ठरत आहे.आजपर्यंत ११७ पुरस्कार मिळविणारे हे दाम्पत्य भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर सापडणे अवघड आहे व ही अखिल भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
दरम्यान डॉ डिगंबर तायडे यांना युनायटेट स्टेटस् ॲाफ वल्ड रेकार्डचा पुरस्कार नुकताच देण्यात आला असून युएस सरकारच्या अमेरीकन बुक ॲाफ वर्ल्ड रेकार्डमध्ये डॉ डिगंबर तायडे यांचे नाव नोंदविण्यात आले आहे.सदर पुरस्कार त्यांना “बेस्ट क्रीयेचीव्ह डायरेक्टर फॅार शॅार्ट म्युजीकल फिल्म”साठी देण्यात आला असून त्या चित्रपटाची नोंद अमेरीकन बुक ॲाफ वर्ल्ड रेकार्डमध्ये करण्यात आली आहे.त्याचबरोबर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकतर्फे दिला जाणारा “अब्राहम लिंकन ग्लोबल एक्सलंट पुरस्कार २०२६”,तसेच बॅालीवूड चित्रपट अभिनेत्री मोनीका बेदी व डायरेक्टर अखिलेश (डीपिटा चॅरिटेबल ट्रस्ट) यांचे हस्ते सहारा स्टार हॅाटेल मुंबई येथे दादासाहेब फाळके इंडियन टेलीव्हीजन ॲवार्ड २०२६ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.त्याचबरोबर गव्हर्नर सुप्रीम लीगन्सी पुरस्कार २०२६,प्रेसीड्ंन्ट अवीनाश सुकुंडे (आय एच ओ आप ए) यांचेकडून मेयर हॅाल मुंबई येथे ईन्टर नॅशनल ह्युमन राईट ॲम्बीसॅडर्स असोशीयेशनतर्फे दोघांना भारत भुषण राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.डॅा.डिगंबर तायडे यांनी डायरेक्ट व प्रोडुस केलेल्या लघू चित्रपटाला मालद येथे अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट क्रीयेटीव्ह डायरेक्टर,बेस्ट म्युजीकल व्हीडीयो फिल्म,बेस्ट सिंगर व बेस्ट शॅार्ट फील्म अशा एकुण चार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.डॉ डिगंबर तायडे यांनी मुंबईत बांन्द्रा कुर्ला संकूलाच्या निर्मीतीत दिलेल्या योगदानासाठी त्यांचे कार्याची नोंद यु एस ए बुक ॲाफ वर्ल्ड रेकार्डमद्धे नोंद करण्यात आली आहे.तसेच नॅशनल हेराल्ड युएस ए येथून प्रकाशीत होणाऱ्या मासीकाच्या मुख पृष्ठावर स्थान देवून त्यांना जिवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.तसेच डॉ डिगंबर तायडे यांनी भारत शूर संग्राम,लंडन हेरॉल्ड तर्फे ग्लोबल इनफ्लूनसर लिडर अवॉर्ड २०२५,ग्रेट इंडियन पार्लमेंट अवॉर्ड,ग्लोबल इंडिया सिने अवॉर्ड,छत्रपती शिवाजी महाराज सोशल अवॉर्ड,खिलाडीयोंके खिलाडी अशा विविध खिताब जिंकून तायडे दाम्पत्याने आपलेली छाप जगावर सोडली असून “हे आभाळ वाटे ठेंगणे ” हि अभिलाषा मनाशी बाळगून आपल्या कार्यात मग्न असलेली डॉ डिगंबर तायडे व शकुंतला तायडे हि जोडगोडी दिवसागणिक विश्वविक्रम करण्यास अहोरात्र मेहनत घेत आहे त्यांच्या कार्याला सलाम अशी भावना प्रत्येक भारतीयांमध्ये निर्माण होण्यास वावगे ठरणार नाही.