डोंगर कठोरा अ.ध.चौधरी विद्यालयांमध्ये जीवन कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले भाकरी-पोळी बनविण्याचे धडे !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ फेब्रुवारी २६ सोमवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये जीवन कौशल्य विकास अंतर्गत आनंददायी शनिवार विशेष उपक्रम राबवण्यात आला.सदर उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी ज्वारी,कळणा,केळाची भाकरी,पोळी,पोहे असे विविध पदार्थ बनविले.सदरील उपक्रमासाठी सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः घरून आणून पदार्थ बनविले व त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त प्रात्यक्षिकासाठी सहकार्य केले.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

सदरहू या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना स्वयंपाकाचे कौशल्य शिकवणे,त्यांना आत्मनिर्भर बनवणे तसेच जीवन कौशल्यांचा विकास करणे हा आहे.यावेळी मुख्याध्यापक नितीन झांबरे,प्रा.नंदन वळिंकार,प्रवीण कुयटे,राजू चिमणकारे,मनीषा तडवी,सचिन भंगाळे,शुभांगीनी पाटील,आर.के.जानकर,विवेक कुलट,सोनाली फेगडे,शुभेच्छा अहिरे,चेतन चौधरी,नयना पाटील,ठकसेन राणे,पराग पाटील,मिलिंद भिरुड,संदीप बाविस्कर तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भाकरी,पोळी आणि पोहे बनवण्याची प्रक्रिया शिकवली तसेच त्यांना स्वयंपाकातील साहित्य आणि त्यांचा वापर कसा करावा हे समजावले तसेच विद्यार्थ्यांना स्वतः हाताने भाकरी,पोळी आणि पोहे बनवण्याची संधी दिली.