Just another WordPress site

यावल वनक्षेत्रातील सुदगाव शिवारात शिकारीच्या उद्देशाने लावलेल्या जाळ्यात अडकुन बिबट्याचा मृत्यु !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ फेब्रुवारी २६ सोमवार

यावल वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील मौजे सुदगाव तालुका रावेर येथे तापी नदीच्या काठाला लागून असलेल्या झाडीजवळ एक बिबट वन्यप्राणी जाळ्यामध्ये अडकलेला असल्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ सहाय्यक वनसंरक्षक यावल समाधान पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर श्रीकांत काळे,मानद वन्यजीव रक्षक जळगाव रविंद्र फालक,पशुधन विकास अधिकारी डॉ.रणजीत पाटील,डॉ.स्नेहल मोटेगावकर,डॉ.प्रदीप काळे,डॉ.राधा रासवे तसेच वन्यजीव अभ्यासक अमन गुजर व वन कर्मचारी यांनी जाऊन पाहणी केली असता सदर बिबट मृत असल्याचे पशुधन विकास अधिकारी यांनी घोषित केले.त्यानंतर त्याचे शवविच्छेदन करून पुढील वैद्यकीय तपासणी कामी सदर मृत बिबटचे व्हिसेरा नमुने गोळा करून सिलबंद करण्यात आलेले आहेत.

सदरील मृत बिबट हा डीहायड्रेशन तसेच हिट स्ट्रोकमुळे मृत झाल्याचे प्रथम दर्शनी शवविच्छेदन दरम्यान आढळून आल्याचे पशुधन विकास अधिकारी यांनी सांगितले.
सदर घटनेबाबत वनरक्षक लोहारा यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात वनगुन्हा जारी केलेला असून पुढील तपास चालू आहे.सातपुडा पर्वत रांगांमध्ये विविध वन्यजीवांचा अधिवास असून काही स्थानिक रानडुक्कर,हरीण किंवा ससे यांच्या शिकरिच्या उद्देशाने जाळे लावल्याचे प्रथम दर्शनी वाटत आहे.पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी करून लवकरच आरोपिला ताब्यात घेतील आणि वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कारवाई केली जाईल तसेच अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्वाना गस्तीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे प्रसिद्धीस पत्रकात जमीर मुनीर शेख (भा व से ) उप वनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.