यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ फेब्रुवारी २६ सोमवार
चोपडा-यावल विधानसभा मतदार संघातील यावल तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गटांमध्ये आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विकास कामांची भूमिपूजन व पूर्णत्वास आलेल्या विकास कामांचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.
दरम्यान कोळन्हावी तालुका यावल येथे स्मशानभूमीमध्ये सांत्वनशेत बांधकाम करणे दहा लक्ष रुपये,किनगाव खुर्द येथे स्मशानभूमीमध्ये सांत्वनशेड बांधकाम करणे दहा लाख रुपये,चुंचाळे येथे स्मशान भूमीमध्ये सांत्वन शेड बांधकाम करणे दहा लाख रुपये,शिरसाड येथे स्मशानभूमी बांधकाम करणे दहा लाख रुपये,मनवेल येथे सांत्वन शेड बांधकाम करणे दहा लक्ष रुपये,थोरगव्हाण येथे स्मशानभूमी बांधकाम करणे दहा लाख रुपये,बोराडे येथे बौद्ध विहार बांधकाम लोकार्पण २०लक्ष रुपये,शिरसाड येथे बौद्धविहार बांधकाम लोकार्पण वीस लाख रुपये,थोरगव्हाण ग्राम पंचायत बांधकाम लोकार्पण या सर्व विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण चोपडा यावल विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते व परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले.याप्रसंगी शिवसेनेचे बबलू कोळी,मुन्ना पाटील,सूर्यभान पाटील,भरत चौधरी,समाधान सोनवणे,विकास साळुंखे,गोटू सोनवणे,दीपक कोळी,विनायक पाटील,दिनू महाजन,विनोद खेवलकर,गोकुळ कोळी,दिनेश साळुंखे,बाळा सोनवणे,संजय पाटील,कलिंदर तडवी,बाळू पाटील,दीपक तायडे,फिरोज तडवी,सुधाकर पाटील,कुर्बान तडवी,पवन पाटील,अशोक हटकर,सोनू माळी यांच्यासह पदाधीकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.