यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ फेब्रुवारी २६ मंगळवार
येथील आगारातून सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी निघणाऱ्या एसटी बसमधे यावल येथील महिला प्रवाशी जमिला मुस्तफा तडवी ह्या लोहारा जाण्यासाठी बसमधे बसलेल्या असतांना बस फैजपूर येथून निघाल्यानंतर सदर महिला प्रवाशी यांची अचानक तब्बेत खराब झाली हे पाहताच वाहक नबाब छबू तडवी यांनी बसवरील चालक रफिक नामदार तडवी यांना सांगताच त्या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता सदर महिला प्रवासी यांना डॉ सुनिल चौधरी यांच्या दवाखान्यात नेले व लागलीच उपचार सुरु झाले.
दरम्यान वेळेवर दवाखान्यात आणल्याने संबंधीत महिला प्रवासी वाचल्या अन्यथा तब्बेत क्रिटिकल झाली असती असे संबंधीत महिला प्रवासी यांनी सांगितले व बरे झाल्यानंतर त्यांनी स्वतः आगारात येऊन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या उपस्थितीत सदर चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला.सदर घटना घडली तेव्हा सदर बसमधे जिल्हा परिसद केंद्रीय शाळा खिरोदा येथील मुख्याध्यापिका संगीता धनंजय पाटील ह्या सदर बसमध्ये प्रवास करत होत्या व त्यांनी चालक व वाहक यांचे कौतुक केले होते.आगारात सत्कार वेळी तेजस शुक्ल,सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक व आगारातील वाहतूक निरीक्षक सिध्दार्थ सोनवणे,निलेश महाजन तसेच चालक दिलीप ठाकरे,हेमंत पाटील व लिपीक संदिप पाटील,अतुल चौधरी व इतर चालक,वाहक,यांत्रीक तसेच प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.आपले कर्तव्य करत असतांना माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या चालक रफिक नामदार तडवी व वाहक नबाब छबू तडवी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.