विविध शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नियमानुसार बदल्या होत नसल्याने नागरिकांच्या कामावर विपरीत परिणाम !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ फेब्रुवारी २६ मंगळवार
तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासुन प्रशासकीय सेवेत एकाच ठिकाणी काही अधिकारी ठाम मारून कार्यरत असुन त्यांच्याविरुद्ध अनेक नागरीकांच्या व समाज सेवकांच्या तक्रारी असतांना देखील सदरील संबधीत अधिकारी हे नियमाने बदलीस पात्र असतांना व त्यांच्या बदल्या होत नसल्याचे चित्र तालुकावासीयांना अनुभवायला मिळत आहे.
दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरीकांना आपल्या विविध शासकीय कामासाठी शासकीय कार्यालयाचे वारंवार यावे लागत असल्याने सदरील अधिकारी हे ‘हम करे सो कायदा’ अशा अविर्भावात सर्व सामान्य नागरीकांशी वागत असल्याची सर्वत्र ओरड होत आहे.सदरहू शासकीय कार्यालयात कामे होत नसल्याने नागरीकांचा प्रशासनावरचा विश्वास उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.यावल तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधीपासुन शासकीय कार्यालयात शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवुन काही प्रशासकीय अधिकारी आपल्या प्रशासकीय सेवेत ठाम मारून बसले आहे.दरम्यान वर्षानुवर्ष एकाच ठीकाणी सेवेत कार्यरत असून संबंधित अधिकारी हे नियमानुसार बदलीस पात्र असतांना त्यांच्या बदल्या होत नसल्याने अधिकारी हे आपल्या सोयीनुसार कार्यालयात येत असल्याने तसेच कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांशी त्यांची वागणुक व्यवस्थीत नसल्याचे नागरीकांमध्ये बोलले जात असून याचा विपरीत परिणाम होत आहे.शासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांवर कुणाचा ही वचक राहीलेला नसल्याने प्रशासन नावाची वस्तु ही तालुक्यात आहे किंवा नाही असा संत्पत प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.