यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ फेब्रुवारी २६ शनिवार
तालुक्यातील हिंगोणा गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका १९ वर्षीय तरूणाचा खुन करण्यात आला असून तिन जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
हिंगोणा तालुका यावल येथील आरोग्य केन्द्राजवळच्या परिसरात आज दि.२८ फेब्रुवारी रोजी संशयीत आरोपी गौरव जाधव आणि मरण पावलेला प्रथमेश मुकेश महाले वय १९ वर्ष राहणार हिंगोणा तालुका यावल यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाला.सदर वादात संशयित आरोपी गौरव जाधव याने प्रथमेश महाले याच्यावर चाकूने हल्ला करून त्यास गंभीर दुखापत केली तर रीना मोहीत गजरे वय १९ वर्ष,मोहीत राजेन्द्र गजरे वय ३० वर्ष आणि निखिल राजेंद्र गजरे वय २६ वर्ष यांच्यावर देखील चाकूने वार करीत जख्मी केले.दरम्यान प्रथमेश महाले यास उपचारासाठी सावदा येथील रूग्णालयात आणले डॉक्टरांनी तपासणी केली असता प्रथमेश महाले या तरुणास मयत घोषीत केले असुन ईतर जख्मींना उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे.याबाबत फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर फरार झालेल्या संशयीत आरोपीचा पोलीस शोध घेण्यात येत असून या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.