Just another WordPress site

यावल-बोरावल मार्गावर एसटी बस व इको कारच्या अपघातात १० विद्यार्थी जखमी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ फेब्रुवारी २६ शनिवार

तालुक्यातील बोरावल-टाकरखेडा मार्गावरील भालशिव फाटयावर एसटी बस व विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या इको कारचा भिषण अपघात होवुन यात १० ते १२ मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की,यावल येथील बस स्थानकावरून बोरावल गावास जाण्यासाठी सकाळी ७-३० सुटणारी बस क्रमांक एम एच ४० एन ९८४५ यावल टाकरखेडा मार्गावरील भालशिव फाटयावर विद्यार्थी वाहतुक करणारी इको कार क्रमांक एम एच ३७ जी ६६८० या गाडीचा धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघात शाळकरी विद्यार्थी वाहतूक करणारी इको चारचाकी वाहनावरील चालकासह १० ते १२ विद्यार्थी जखमी झाले आहे.तर यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली असुन प्रथम जखमी विद्यार्थ्याना उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रूग्णालयात आणले व प्रथम उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पोलीसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असून अपघातातील विद्यार्थी वाहतुक करणारी कार ही जमा करण्यात आली असून अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे वृत्त आहे.दरम्यान यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांना अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी तात्काळ ग्रामीण रूग्णालय व पोलीस ठाणे गाठले व अपघाताची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.