Just another WordPress site

समता सैनिक दलाच्या शंभर वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोटारसायकल रॅली !!

समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी समता सैनिक दलात सहभागी व्हा-राज्य संघटक विजय निकम यांचे आवाहन !!

जळगांव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ मार्च २६ शनिवार

विश्वभूषण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ मार्च १९२७ रोजी समता सैनिक दलाची स्थापना केली आहे व आज या संघटनेला शंभर वर्षे पूर्ण झालेली असून या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय आर्थिक लढा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे.डॉ बाबासाहेबांनी सांगितले की समता सैनिक दल ही आपली ध्येयवादी संघटना असून ही गाव तिथे शाखा घर तिथे सैनिक यानुसार प्रत्येक गावात प्रत्येक प्रांतात असली पाहिजे तसेच सर्व जाती धर्माच्या जनतेला या संघटनेत सहभागी करून घ्या प्रत्येकाला समता सैनिक दलाचा सैनिक म्हणून सदस्य करून घ्या असे या संघटनेबाबत सांगितले आहे.सदरहू या संघटनेची प्रत्येक भारतीयाला गरज आहे कारण ही संघटना कुठलीही जात-पात धर्म पंथ भेदभाव यावरून कुठलाही भेदभाव करीत नाही तसेच या देशांमध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ही महान तत्वे रुजवली गेली पाहिजे या देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे असे महान ध्येय समता सैनिक दलाचे आहे.परिणामी हे ध्येय आपल्याला यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दल मजबूत करणे ही काळाची गरज आहे समता सैनिक दलात सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन राज्य संघटक विजय निकम यांनी रॅलीच्या समारोप प्रसंगी केले.

दरम्यान काल दि.१३ मार्च शुक्रवार रोजी समता सैनिक दल संघटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली या अनुषंगाने जळगाव शहर व ग्रामीण शाखेच्या वतीने समता सैनिक दलाच्या वतीने समता सैनिक दलाचे राज्य संघटक विजय निकम यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले.प्रसंगी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विजय निकम यांच्या हस्ते माल्याअर्पण करून रॅलीची सुरुवात रेल्वे स्टेशन येथून करण्यात आली.सदर रॅली नेहरू चौक,टॉवर चौक,चित्रा चौक मार्गे गोलानी मार्केट तेथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरून नवीन बस स्टॅन्ड,स्वातंत्र्य चौक,आकाशवाणी चौक सर्कल,रिंग रोड,बहिणाबाई चौक मार्ग,गोकुळ स्वीट मार्ट समोरून सहस्रबुद्धे हॉस्पिटल यांच्या जवळून शाहू महाराज हॉस्पिटल मार्गे कोर्टासमोरून गोविंदा रिक्षा स्टॉप,नेहरू चौक पुन्हा रेल्वे स्टेशन जळगाव येथे रॅलीचा समारोप करण्यात आले.या रॅलीत जिल्हा मुख्य संघटक चैतन नन्नवरे,जिल्हा संघटक राजेश गवई,महानगराध्यक्ष मुकुंदराव भालेराव,पूर्व जिल्हा संघटक सुपडू संदानशिव,महानगर सचिव संजय सपकाळे,संघटक अनिता कापुरे,प्रतिभा घोडेस्वार,निलेश बाविस्कर,विनोद निकम,एकनाथ सोनवणे,कवी वसंत सपकाळे,गौतम सोनवणे,रमेश उमाळे,भैय्यासाहेब निकम,सुधीर शेंगदाणे,श्रीकांत शिरसाट,संतोष बागुल,सोमा अहिरे,राजु वानखेडे,किरण तायडे यांच्या सह सर्व कार्यकर्ते,सैनिक या रॅलीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.