Just another WordPress site

यावल-दहिगाव सौखेडा सिम मार्गावरील रस्त्याच्या बाजूच्या धोकादायक झांडाच्या फांद्या तोडण्याची प्रवाशी वर्गाकडून मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ मार्च २६ शनिवार

यावल ते दहिगाव सौखेडा सिम जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही कडेला झाडांच्या फांद्या वाढलेले असल्याने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या फाद्यांचा फटका लागुन त्यांना गंभीर दुखापतीची शक्यता व्यक्त करण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्यावरील धोकादायक वाटणाऱ्या झाडांच्या फांद्या काढाव्यात अशी मागणी नागरिक करीत आहे.

यावल दहिगाव सौखेडा सिम मार्गाच्या सुमारे सहा ते सात किलोमिटर रस्त्यावर दोन्ही कडेच्या बाजुला मोठ-मोठी झाडे आहेत.सदरच्या या झाडांच्या फांद्या या मार्गावरील रस्ता अरूंद असल्याने या झाडांच्या वाढलेल्या फांद्या या एसटी बसने प्रवास करीत असतांना खिडकी जवळ बसलेल्या प्रवासांना दुखापत होत असुन दरम्यान या फांद्यामुळे काही मोठी अप्रीय घटना होवु नये यासाठी यावल सार्वजनिक विभागाने तात्काळ रस्त्याच्या दोन्ही बाजुस वाढलेल्या धोकादायक फांद्या काढाव्यात अशी मागणी प्रवासी बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.