Just another WordPress site

यावल नगरपरिषदतर्फे मालमत्तांसाठी ‘अभय योजना’ व्याज व दंडावर १००% सूट !! नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा-नगराध्यक्ष छाया पाटील यांचे आवाहन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ मार्च २६ मंगळवार

येथील नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ राबविण्यात येत असून ही योजना दिनांक २५ मार्च २६ पर्यंत लागू राहणार आहे.या कालावधीत नागरिकांनी थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर एकरकमी भरल्यास त्या थकबाकीवर आजपर्यंत आकारण्यात आलेल्या व्याज व दंडावर १०० टक्के सूट देण्यात येणार आहे.

यावल नगरपरिषदेच्या नोंदीनुसार अनेक निवासी मालमत्ताधारकांकडे मागील काही वर्षांपासून कर व पाणीपट्टी थकबाकी प्रलंबित आहे.नागरिकांना आर्थिक सवलत देऊन थकबाकी नियमित करण्यासाठी तसेच नगरपरिषदेच्या विकास कामांना गती देण्यासाठी ही विशेष अभय योजना राबविण्यात आली आहे.यावल नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी सांगितले की,नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा,स्वच्छता,रस्ते,प्रकाश व्यवस्था आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा सुरळीत चालू ठेवण्या साठी कर व पाणीपट्टीची वेळेत वसुली होणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांना थकबाकी नियमित करण्याची संधी देण्यासाठी २५ मार्च २६ पर्यंत व्याज व दंडावर १००% सूट देणारी अभय योजना राबविण्यात येत आहे.नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली थकबाकी एकरकमी भरावी.तसेच त्यांनी पुढे सांगितले की,योजनेचा लाभ न घेतल्यास नियमानुसार पुढील काळात थकबाकीदारांवर वसुलीची कडक कारवाई करण्यात येऊ शकते त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तत्काळ नगरपरिषद कार्यालयात किंवा संबंधित विभागात कर भरावा.

नगराध्यक्षांचे आवाहन !!

याबाबत यावल नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांनी सांगितले की,यावल शहराच्या सर्वांगीण विकासा साठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि थकबाकी कमी करण्यासाठी ही अभय योजना राबविण्यात आली आहे.व्याज व दंडावर १००% सूट ही मोठी संधी असून शहरातील सर्व निवासी मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.नागरीकांनी आपला कर वेळेत भरून शहराच्या विकासात आपले सहभाग नोंदवावे.२५ मार्च २६ पुर्वी एकरकमी कर भरून व्याज व दंडमाफीचा लाभ घ्यावा आणी यावल शहरास अधिक स्वच्छ,सुबक व विकसीत करण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांनी यावल शहरवासीयांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.