आर्वी येथील गजानन महाराज मंदिरातील कळस व चांदीची छत्री चोरणारा अट्टल चोरटा मोर्शी पोलिसांच्या ताब्यात !! आरोपीकडून दोन लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त !!
अनिल ठाकरे,पोलीस नायक
वर्धा जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२१ मार्च २६ शनिवार
जिल्ह्यातील लहान आर्वी येथील गजानन महाराज मंदिरातील कळस व चांदीची छत्री चोरणारा अट्टल चोरटा मोर्शी पोलिसांनी गजाआड केला असून आरोपीकडून दोन लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार,दि.१८ मार्च २६ रोजी मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी मोर्शी पोलीस स्टेशन येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिलेल्या सूचनेनुसार पोलीस स्टेशन हद्दीत संशितरित्या वावरणाऱ्या व्यक्तीला चेक करून दोषी आढळल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.दरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला रात्री पेट्रोलिंग दरम्यान मोर्शी शहरात कोणीतरी अज्ञात व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन संशयीतरीत्या फिरत असलेल्या व्यक्तीला विचारपूस केली असता त्या व्यक्तीने उडवा उडवीची उत्तरे दिली असल्याने पोलिसांचा संशय अधिकच वाढला त्या व्यक्तीचे जवळील पिशवीमध्ये पाहिले असता त्यामध्ये चांदीची छत्री व कळस पोलिसांना दिसून आला.ह्या वस्तू चोरीच्या असल्याचे संशयावरून पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता सदर व्यक्ती आरोपीने त्याचे नाव गोपाल मोहन युवनाते वय ४२ वर्ष राहणार पांढर घाटी तालुका वरुड जिल्हा अमरावती यास ताब्यात घेऊन त्याने छत्री व कळस किंमत अंदाजे दोन लाख २५ हजार रुपये चा मुद्देमाल वर्धा जिल्ह्यातील लहान आर्वी येथील गजानन महाराज मंदिरातील चोरी केल्याचे कबूल केले.पोलिसांनी सदर माल जप्त करून आरोपीविरुद्ध कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये मोर्शी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन आष्टी यांच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर मोर्शी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल आठवले मोर्शी यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन मोर्शी येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर,पोलीस अंमलदार स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते,अथर्व कोहळे यांनी केली.