Just another WordPress site

कांद्याच्या पिकात अफूची लागवड !! ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त !! बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी !!

शेख इमरान,पोलीस नायक

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.३१ मार्च २६ मंगळवार

“मिशन परिवर्तन” अंतर्गत पो.स्टे.अंढेरा हद्दीत शेतात अवैध अफूची लागवड करणाऱ्या एकास पकडले असून स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईत १११.३३ किलोग्रॅम अंमली पदार्थ ओलसर अफू किंमत ४४ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी “मिशन परिवर्तन” राबविण्यात येत आहे.सदर अनुषंगाने जिल्ह्यात अफू,गांजा व ईतर तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक,साठवणूक,उत्पादन व विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते.तद्नुसार नमुद आदेशाप्रमाणे पोनि.सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन पथकांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अंमली पदार्थ संबंधाने गोपनीय माहिती काढून कार्यवाही करणेबाबत सुचित केले होते.प्रकरणी स्था.गु.शाच्या पथकाने काल दि.३० मार्च २६ रोजी पो.स्टे अंढेरा हद्दीत अफू या अंमली पदार्थ संबंधाने कार्यवाही केली असून सविस्तर विवरण खालील प्रमाणे आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,काल दि.३० मार्च सोमवार रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पो.स्टे.अंढेरा हद्दीत ग्राम धोत्रा नंदई शिवारात संजय तुकाराम चेके रा.सरंबा या ईसमाने स्वतःचे शेतामध्ये अवैधरित्या व विनापरवाना अफूच्या झाडांची लागवड व संगोपन करुन अफूची चोरटी विक्री करण्याच्या उद्ददेशाने ताब्यामध्ये बाळगून आहे अशा माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो.स्टे.अंढेरा हद्दीत ग्राम धोत्रा नंदई शिवारातील गट नं.३६८ मधील संजय तुकाराम चेके रा.सरंबा यांचे शेतामध्ये पंचा समक्ष रेड केली असता.सदर शेतामध्ये आरोपीने कांदा बियाण्यांच्या उभ्या असलेल्या पिकामध्ये अफूच्या झाडांची लागवड,संगोपण व साठवणूक केली असल्याचे दिसून आले.वरुन आरोपी संजय तुकाराम चेके वय ५० वर्षे,रा.सरंबा ता.देऊळगांव राजा जि.बुलढाणा यांचे ताब्यातून (१) ओलसर अफूची बोंडे असलेली ओलसर झाडे वजन १११ किलो ३३ ग्रॅम किं.४४ लाख ५३ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरील आरोपी विरुध्द पो.स्टे.अंढेरा येथे अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम (N.D.P.S.Act.) कलम ८ (क),१८ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. अंढेरा करीत आहेत.सदरची कार्यवाही निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तसेच श्रेणिक लोढा,अपर पोलीस अधीक्षक खामगांव,अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा,श्रीमती मनिषा कदम उपविपोअ.देऊळगांव राजा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.सुनिल अंबुलकर स्था.गु.शा.बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. प्रताप बाजड,पोहेकॉ.दिगंबर कपाटे,पुरुषोत्तम आघाव,मपोहेकॉ.वनिता शिंगणे,पोकॉ.मंगेश सनगाळे,मनोज खरडे,सतीश नाटेकर,मपोकॉ.पूजा जाधव,चापोहेकॉ.समाधान टेकाळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा,पोहेकॉ.राजू आडवे,पोकॉ.कैलाश ठोंबरे तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा,सपोनि.रुपेश शक्करगे प्रभारी अधिकारी व पो.स्टॉफ पो.स्टे.अंढेरा यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.