आ.प्रशांत बंब यांनी शिक्षकांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन
आ.प्रशांत बंब यांचा जाहीर निषेध व त्यांनी माफी मागावी ; निवेदनाद्वारे ४५ सभासदांची मागणी
यावल – पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य नुकतेच केले होते.त्याच्या निषेधार्थ आज दि.२९ रोजी आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत तसेच त्यांनी शिक्षकांची माफी मागावी अशा आशयाचे निवेदन प्राथमिक शिक्षक संघ तालुकाध्यक्ष श्रीकांत मोटे यांच्यासह ४५ सभासदांच्या उपस्थितीत तहसीलदार राजेश पवार यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि,आमदारांना राज्यातील प्रश्न,समस्यांचे निराकरण व मांडण्याचे अधिकार आहेत.यात भाजपा चे आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात बोलतांना सरसकट सर्व शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करण्याबाबत आणि त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल अपशब्द वापरले.आज रोजी शिक्षकांमुळे देशातील संस्कृती,मूल्ये व लोकशाही टिकून आहे.मात्र दोषी शिक्षकांची तक्रार करण्याऐवजी सर्व शिक्षकांचा अवमान करणाऱ्या आ.प्रशांत बंब यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत तसेच आ.प्रशांत बंब यांनी सर्व शिक्षकांची जाहीर माफी मागावी अन्यथा शिक्षकांच्या नाराजीचे व रोषाचे परिणाम शासनाला भोगावे लागतील अशा आशयाचे निवेदन आज दि.२९ रोजी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार राजेश पवार यांना देण्यात आले.
निवेदनावर प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत मोटेयांच्यासह योगेश इंगळे,विजय बाऊस्कर,ललित पाटील,विक्रांत चौधरी,सचिन पवार,युनूस तडवी,जहांगीर तडवी,अजय बाविस्कर.सुदाम महाजन,हमीद तडवी,प्रवीण राणे,विपीन वारके,अतुल चौधरी,फकिरा तडवी,सै.आदिल हुसेन हिफाजत अली,निसार अहमद झिपरूखाँ ,सै.मो.हनीफ कुर्बान अली,शेखर तडवी,किशोर भोई,दिवाकर सरोदे,किशोर पाटील,सुदाम महाजन,सकीन तडवी,कुंड गाजरे,ज्योती जाधव,भाग्यश्री पाटील,मनीषा तडवी,नशिबा तडवी,सुलोचना सरोदे,अर्चना कोल्हे,कल्पना माळी,अजित तडवी,वासुदेव बावस्कर,संदीप बारी,रज्जाक तडवी यांच्यासह ४५ सभासद निवेदन देतांना उपस्थित होते.