Just another WordPress site

यावलच्या तुबा संस्थेच्या वतीने पंडित नेहरू व कस्तुरबा गांधी पुरस्काराचे वितरण !! विविध क्षेत्रातील ३३ मान्यवरांचा सन्मान !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०५ एप्रिल २६ रविवार

जिल्ह्यातील यावल येथील तुबा नाज हेल्प मल्टि पर्पज सोसायटीच्या वतीने जळगाव येथे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील ३३ मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे हा आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी श्री मनोज देशमुख हे होते त्याच बरोबर गट शिक्षणाधिकारी श्री विजय शांतीलाल पवार, सहाय्यक कृषी अधिकारी सतीश बाविस्कर पालघर, एकता संघटन अध्यक्ष फारुक शेख जळगाव,हकीम आर चौधरी मुक्ताईनगर,डोंगरे संस्था अध्यक्ष नाना डोंगरे, लोकनियुक्त सरपंच बबन खा तडवी, यांची उपस्थिती होती.
*कस्तुरबा गांधी पुरस्काराचे मानकरी*

सौ.निता सतिश बाविस्कर/कोळी ग्रामपंचायत अधिकारी इगतपुरी ,नाशिक (ग्रामगौरव पुरस्कार),सौ .सिमा सुरेंद्र सुर्यवंशी
मुख्याध्यापिका श्रीमती द्रौ .रा. कन्या शाळा अमळनेर जीवन गौरव पुरस्कार,मेहेर निगार मोहम्मद इलयास फैजपूर
” शिक्षणसेवा पुरस्कार”,सौ.माधुरी राजेश करडे पुणे “क्रीडा गौरव पुरस्कार”,
मयुरी अनिल खैरनार, नांदगाव जि. नाशिक (क्रीडा गौरव पुरस्कार) रुखसाना बशीर अली सैय्यद, धुळे (आदर्श नारी पुरस्कार),श्रीमती सुमन धर्मा पवार, धुळे (नारी शक्ती पुरस्कार),उम्मे अनिसा बेगम अब्दुल अजीम, खामगाव “शिक्षण सेवा पुरस्कार,श्रीमती सुवर्णा कौतिक धनगर हातेड अतर्गत वाळकी
ता. चोपडा जि.जळगाव लोकसेवा पुरस्कार डॉ अर्चना प्रशांत सूर्यवंशी, संचालिका नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी ता. धरणगाव जिल्हा जळगाव “नारीशक्ती पुरस्कार”
,शबनम डफेदार पुणे, आदर्श नारी पुरस्कार”कल्पना दबडे, गोमेवाडी, ता. आटपाडी जि. सांगली,(नारीशक्ती पुरस्कार),सौ. हेमलता प्रदीप गीते,अहिल्या नगर(साहित्य सेवा पुरस्कार),डॉ.सौ. अस्मिता खिस्ती,अहिल्ल्यानगर (“आदर्श नारी पुरस्कार”), सरोज प्रभाकर आल्हाट , अहिल्यानगर
(“समाजसेवा पुरस्कार”)
*पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्काराचे मानकरी*
श्री सतिश ललिताबाई सिताराम बाविस्कर , सहा. कृषी अधिकारी पालघर (आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार)
आमोद सुरेश नलगे,अहिल्यानगर (लोकसेवा पुरस्कार),नाना किसान डोंगरे, निमगाव वाघा,जीवन गौरव पुरस्कार, धनेश्वर पतींगराव भोस(माजी सैनिक) मोशी,पुणे, भाऊसाहेब लक्ष्मण कदम, मु.पो. खरवंडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, सुनील उर्फ अप्पा नारायण साळवी,पुणे आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार, विनोद विठ्ठल पाठक (ओतारी) (धुळे जिल्हा पोलिस),आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार राजेंद्र शंकरराव घोडके (पत्रकार) मु. पो. मांडवगण ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर,डि.बी.पाटील,चोपडा जि.जळगाव (जीवन गौरव पुरस्कार), दशरथ दौलत पाटील, अडावद ता चोपडा जि. जळगाव (जीवन गौरव पुरस्कार), बबन खा लाल खा तडवी, लोकनियुक्त सरपंच अडावद ता. चोपडा (ग्राम गौरव पुरस्कार),फारूक पटेल,माजी मुख्याध्यापक अडावद ता. चोपडा (आदर्श व्यक्तिमत्व), फारुक शेख अब्दुल्लाह,जळगाव
“समाज भूषण पुरस्कार”,शेख मुन्शी शेख रहेमान खाटिक, चोपडा,
मरणोपरांत “समाज गौरव पुरस्कार” शेख शब्बीर शेख रशीद, अडावद जि. जळगाव ( शिक्षणसेवा पुरस्कार” ) सैय्यद जाकीर अली लियाकत अली,नगरदेवाळा जि.जळगाव गुणवंत शिक्षक पुरस्कार,डॉ शेख मोहम्मद इलयास असगर,फैजपूर जि. जळगाव शिक्षणसेवा पुरस्कार कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आमोद सुरेश नलगे अहिल्ल्यानगर हे होते, त्याच बरोबर उपजिल्हाधिकारी मनोज देशमुख,फारुक शेख यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित फारुक पटेल अडावद यांनी सादर केले तर सूत्रसंचालन फारुख शाह नौमानी यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन, संस्था अध्यक्ष डॉ जावेद शेख यांनी केले होते तर
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फारुक पटेल,अडावद,शब्बीर सर अडावद, अय्युब शेख यावल, अल्ताफ शेख यावल, जुनेद पिंजारी आसोदा, जुबेर मण्यार भुसावळ, अबूल मुजफ्फर शाह, सुफियान शाह यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.