यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सावखेडा सिम येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक रमेश उखर्डू कोठोदे हे आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त होत असुन त्यांचा सेवा पुर्तीचा निरोप समारंभ कार्यक्रम यावल येथील पंचायत समिती कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.रमेश कोठोदे हे मुळ पाडळसा तालुका यावल येथील रहीवासी असुन अतिशय सामान्य कष्टकरी कुटुंबातुन जन्मास आलेले असून त्यांनी यावल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सावखेडा सिम ग्रामपंचायतीसह आडगाव ग्राम पंचायत मध्ये ग्रामसेवक पदाची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळलेली आहे.आपल्या प्रदीर्घ सेवेतुन रमेश उर्खडू कोठोदे हे दिनांक ३१ ऑक्टोबर २२ रोजी प्रसाकीय सेवेतुन सेवानिवृत्त झाले.रमेश कोठोदे यांनी आपल्या ३६ वर्षाच्या सेवा कार्यकाळाची सुरूवात वर्ष १९८६ मध्ये केली त्यांनी सर्वप्रथम एरंडोल पंचायत समिती पासुन आपल्या प्रशासकीय सेवेची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका,रावेर तालुका व भुसावळ तालुका,मुक्ताईनगर पंचायत समिती व यावल पंचायत समिती याठीकाणी ३६ वर्षे निष्कलंक व उत्कृष्ठरित्या प्रशासकीय सेवा बजावली.
याप्रसंगी संजय भारंबे,किशोर सपकाळे,शेखर पाटील,गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावल पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय ईमारती मधील सभागृहात ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव संजय भारंबे,पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील,सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे,ग्रामसेवक गौतम वाडे,ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी यांच्यासह आदी मान्यवर मंडळी व अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत रमेश कोठोदे यांच्या भावनीक कौटुंबीक निरोप समारंभ संपन्न झाला.यावेळी कोठोंदे यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक संघटनेचे तालुका सचीव पुरूषोत्तम तळेले यांनी मानले.