Just another WordPress site

यावल पंचायत समितीच्या जन्म-मृत्यु नोंद विभागातुन नागरिकांच्या नोंदी गायब झाल्याची नागरीकांच्या तक्रारी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० एप्रिल २६ शुक्रवार

येथील पंचायत समिती कार्यालयातील जन्म-मृत्यु दाखले विभागात तालुक्यातील बहुसंख्य ग्रामस्थांचे जन्माचे दाखले ग्रामपंचायत स्तरावर नोंदी असतांना मिळत नसल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.तर काही नागरीकांच्या जन्माच्या नोंदी गायब झाले असल्याचे स्पष्ट होत असल्याने हे ग्रामस्थ शासकीय कामांच्या पासून वंचित राहत असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आहेत.

दरम्यान शासनाने नव्यानेच आधार कार्ड दुरुस्ती किंवा नव्याने काढण्याकरिता जन्माच्या दाखल्याची अट घातलेली आहे व याकरिता शाळा सोडल्याचा दाखला न घेता जन्माचाच दाखला हवा अशा अटी सेतू सुविधांकडे असल्याने ग्रामस्थांना यावल पंचायत समितीच्या कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.मात्र बहुसंख्य ग्रामस्थांच्या जन्माच्या दाखलाच्या नोंदी या ठिकाणी मिळून येत नाहीत तसेच एकेक वर्षातील दोन-तीन पाने या मधून गायब झालेले आढळून येत आहेत याला नेमके कारण काय ? तसेच कागदपत्र कुजके की कागदपत्र गहाळ केले ? हा प्रश्न तालुका वासियांमध्ये निर्माण झालेला आहे.सदरहू या नोंदी मिळत नसल्याने या लोकांना त्यांच्या शासकीय योजनांसाठी वंचित राहावे लागत आहे.ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार पंचायत समितीमध्ये नोंदी केल्या जातात काही ग्रामपंचायतीमध्ये नोंद आढळून येत आहे मात्र पंचायत समिती कागदपत्रे गहाळ झालेली दिसून येतात.यासाठी शासनाने पर्यायी मार्ग काढावा अशी अपेक्षा त्रस्त ग्रामस्थांमधून होत आहे किंवा पूर्वी प्रमाणेच प्रशासनाने नागरीकांना मिळणाऱ्या आधार कार्डसाठी शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य धरावा अशी अपेक्षा या त्रस्त ग्रामस्थांमधून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.