Just another WordPress site

करण धनगर याची पोलीस खात्यात निवड झाल्याबद्दल यावल महाविद्यालयातर्फे सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ एप्रिल २६ शनिवार

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थी करण विनोद धनगर याची पोलीस खात्यात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.आर.गायकवाड यांच्या हस्ते करण धनगर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य एम.डी.खैरनार तसेच उपप्राचार्य डॉ.एच.जी.भंगाळे उपस्थित होते.या सत्कार समारंभाच्या वेळी मिलिंद बोरघडे,डॉ.पी.व्ही.पावरा आणि प्राध्यापक नरेंद्र पाटील यांच्यासह इतर प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.उपस्थित मान्यवरांनी करण धनगर यांच्या यशाचे कौतुक करत त्याला आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात अधिक भर पडली असून भविष्यात इतर विद्यार्थ्यांसाठीकरण धनगर यांने मिळवलेले यश प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.