Just another WordPress site

मुंबई महापालिका जिंकण्याचा भाजपचा प्लॅन आज रात्री ८ वाजता ठरणार ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

महाराष्ट्रातील मोठे उद्योग हे गुजरात आणि इतर राज्यात गेल्याने राज्यातील शिंदे गट आणि भाजपच्या सरकारवर विरोधकांकडून खासकरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि आदित्य ठाकरेंकडून जोरदार टीका होत आहे यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देत आव्हानही दिले आहे.दुसरीकडे नाणारला रिफायनरी होणारच असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचीही बैठक होत आहे.दुसरीकडे शिवसेनेतील ४० बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरें कडून नवे उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.भाजप कोअर कमिटी आणि सर्व मंत्र्यांची आज रात्री मुंबईत आठ वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे या बैठकीत मंत्री आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयाबद्दलही चर्चा होणार आहे.भाजपच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,सुधीर मुनगंटीवार,राधाकृष्ण विखे पाटील,गिरीश महाजन,रवींद्र चव्हाण,आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.पंकजा मुंडेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह लोकसभा प्रवासाची जबाबदारी असलेल्या सर्व संघटन मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबत या बैठकीत विचार मंथन होणार आहे.विनोद तावडे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ‘मिशन ४५’ अभियान या आधीच सुरू केले आहे.या अभियानाचा आढावा घेण्यासाठी उद्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपने बोलवली आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक होईल.महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने किमान ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.यात प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ यांचा समावेश आहे.या मतदारसंघातील तयारीचा आढावा आणि येणाऱ्या काळातल्या योजना यासाठी उद्या विभागीय संघटन मंत्री लोकसभा प्रवासाची जबाबदारी असलेले प्रमुख नेते यांची बैठक होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.