यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मागील तिन वर्षापासुन प्रलंबीत बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामास सुरुवात करण्यात यावी तसेच यावल येथून कोल्हापुर व इंदौर बससेवा सुरू करण्यात यावी त्याचबरोबर प्रवाशांच्या विविध समस्याबाबत यावल शहर शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख तसेच प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष जगदीश कवडीवाले व त्यांच्या सोबत आदी महत्वाच्या पदधिकाऱ्यांनी यावलचे एसटी आगारप्रमुख डी बी महाजन यांची भेट घेत प्रवासांच्या विविध समस्या व नविन लांबपल्याच्या बसेस सुरू करण्याची मागणी केली.
जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्व बसस्थानकांच्या इमारतींचे नुतनीकरण करण्यात आले आहे मात्र नाशिक विभागात उत्पन्नाच्या श्रेणीत कायम अग्रस्थानी असणाऱ्या यावलच्या बस स्थानकाचा कायापालट कधी होणार?व यावल आगारातुन यावल ते कोल्हापुर,यावल ते इन्दौर यांच्यासह आदी लांब पल्याच्या एसटी बसेस सुरू करण्यात याव्यात तसेच प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने यावल ते पुणे ही दुपारी चार वाजता सुटणारी बस ही सायंकाळी ७ वाजता नियमित सोडण्यात यावी अशा विविध प्रवासी समस्यांबाबत यावलचे नुकतेच रूजु झालेले एसटी आगाराचे व्यवस्थापक डी बी महाजन यांची भेट जगदीश कवडीवाले व शरद कोळी यांच्यासह संतोष धोबी,पप्पु जोशी,युवा सेनेचे सारंग बेहडे आदी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेवुन प्रवासी समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.याविषयावर आगार व्यवस्थापक डी बी महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन शिष्टमंडळाशी बोलतांना महाजन यांनी सांगीतले की यावल आगारास येत्या डिसेंबर महीन्यात काही नविन बसेस येणार असुन त्या आगारात दाखल झाल्यावर आपण मागणीनुसार लांबपल्याच्या शेडुल साठी बसेस सुरू करणार असल्याचे सांगीतले, प्रवासांच्या समस्यांसाठी आपण आपल्या सोबत असल्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी वार्तालाप करतांना सांगीतले तसेच लवकरात लवकर यावल एसटी बसस्थानकाच्या नविन इमारतीच्या कामास मंजुरी मिळावी याचा आपण देखील पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.