नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असून १ आणि ५ डिसेंबरला गुजरातचे मतदान पार पडणार आहे.दरम्यान पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान पार होणार आहे.गुजरातमध्ये १८२ जागांवर मतदान होणार असून गुजरातच्या १५व्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहेत त्याचदिवशी हिमाचल प्रदेश विधानसभा निकालाचेही निकाल येणार आहेत.यंदाच्या निवडणुकीत ४.९ कोटी मतदार असून ४.६ लाख युवा मतदार आहेत.दिव्यांगासाठी १८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ९. ८९ लाख वृद्ध नागरिक मतदान करणार आहेत.
गुजरातमध्ये २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकून ४.३३ कोटी मतदारांची नोंद होती.२०१७मध्ये भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत ९९ जागांवर विजय मिळवला होता.तर काँग्रेसला ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते तर दोन जागांवर बीटीपी (भारतीय ट्रायबल पार्टी) आणि एका जागेवर एनसीपीच्या उमेदवारांचा विजय झाला होता तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते.दरम्यान २०१७ला झालेल्या निवडणुकीत भाजपला १६ जागांवर फटका बसला होता तर काँग्रेसच्या १६ जागा वाढल्या होत्या मात्र तरीही भाजपच निवडणुकीत वरचढ ठरला होता.गुजरात विधानसभेसाठी अरविंद केजरीवा यांच्या आम आदमी पक्षाने भाजपला थेट आव्हान दिले आहे त्यामुळे गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे.आम आदमी पक्षाच्या एन्ट्रीने समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.केजरीवाल यांनी मोफत वीज,पाणी आणि शिक्षा सारखी आश्वासने दिली आहेत.