Just another WordPress site

बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही,ते सर्व माझे भाऊ आहेत-ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

बंडखोर आमदार परत येतील त्यांच्यासाठी परतीचे दोर कापलेले नाही असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.मी कधीही या बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही ते सर्व माझे भाऊ आहेत,संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात आहेत असा दावा करत सुषमा अंधारेंनी खळबळ उडवून दिली आहे.नवनीत राणा या आमच्या मोठ्या भगिनी आहेत त्यांना आम्ही आक्का म्हणतो,आमच्या ‘गीता ताई’ आहेत आपण निवडून दिले,आपल्या पाठिंब्यावर निवडून आल्यात पण कधी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होतो,कधी माणसे बेईमान होतात,कधीतरी त्यांना त्यांच्या चुका कळतील परतीचे दोर आमच्याकडून कापलेले नाहीत.मातोश्री सर्वांना प्रेमाने जवळ करते असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

या बंडखोर आमदारांपैकी आत्ताच्या घडीला जर पहिला कुणी परत येईल तर ते म्हणजे संजय शिरसाठ कारण ते प्रचंड अस्वस्थ आहेत, परेशान आहेत,संजय शिरसाठ यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली नाही या उलट संभाजी नगरमध्ये अब्दुल सत्तार,संदिपान भुमरे व अतुल सावे या तिघांना मंत्रीपद मिळाले यामुळे संजय शिरसाठ यांच्या मंत्रीपदाची आशा मावळली.शिंदे गटाची जी कार्यकारणी जाहीर झाली त्यातही संजय शिरसाठ यांना कोणतेही स्थान मिळाले नाही.सगळ्यात जास्त पश्चाताप संजय शिरसाठ यांना होतोय आणि संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात सुद्धा आहेत असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेऊन त्यांचा समाचार घेत आहेत.दरम्यान आज सुषमा अंधारे यांनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपले मत व्यक्त करत भाजपसह शिंदे सरकार व बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.