Just another WordPress site

बसने कारला दिलेल्या धडकेत ११ जणांचा मृत्यू ;दोन चिमुकल्यांचा समावेश

मध्यप्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

मध्य प्रदेशात बैतुल जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे.बसने कारला दिलेल्या धडकेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील आहेत.मध्य प्रदेशातील बैतुल येथे रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे.बैतुल जिल्ह्यात परिसरात बस आणि कारची समोरासमोर धडक बसली यात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे यात दोन चिमुकल्यांचा समावेश आहे तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान अपघातात मृत्यू झालेले कामगार हे महाराष्ट्रातील अमरावती येथे निघाले होते रात्री २ वाजता बसने त्यांच्या एसयुव्हीला समोरासमोर धडक दिली ही धडक इतकी जोरत होती की कारचा चेंदामेंदा झाला आहे.पोलिसांनी कारचा पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढाले आहेत.एसयुव्ही बसच्या आतमध्ये घुसली असल्याने इतर मृतदेह काढण्यासाठी तिचा पत्रा कापावा लागला अशी माहिती बैतूलचे पोलीस अधिक्षक सिमला प्रसाद यांनी दिली आहे या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांबाबत शोक व्यक्त केला आहे.तसेच मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत आणि जखमींना ५० हजारांच्या मदतीची घोषणा केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.