Just another WordPress site

नशिराबाद येथील तरुणाची धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

रेल्वेखाली झोकून देत चंद्रकांत रमेश माळी (वय ४१) यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास भादली रेल्वेस्थानकाजवळ घडली या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे चंद्रकांत माळी वास्तव्यास असून ते खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करीत होते.बुधवारी दुपारी ते जेवण करून बाहेर गेले दरम्यान त्यांनी भादली रेल्वेस्थानकाजवळील अपलाइनवरील खांब क्रमांक ४२९/०२ गेट क्रमांक १५२ जवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत मृत्यूला कवटाळले.लोकोपायलटने तत्काळ घटनेची माहिती रेल्वेस्थानक प्रबंधकांना दिली त्यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.स्टेशन प्रबंधकांनी सदरील घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना दिली.त्यानुसार सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे व विनोद भोई यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटविली त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.माळी यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.नशिराबाद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.