अच्छे दिन पाहायला मिळालेच नाही;शरद पवार यांची केंद्र सरकारवर टिका
आश्वासन देऊन ते पाळण्यास केंद्र सरकार अपयशी पवारांचा केंद्रावर निशाणा
मुंबई – पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भाजपा जनतेचा आतापर्यंत भ्रमनिराश झाला असून भाजपा कडून लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आतपर्यंत त्यांनी आश्वासन ते पाळण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले असून त्यांनी आश्वासनं पाळलेली नाहीत्यामुळे त्यामुळे त्यांनी अच्छे दिन येणार या आश्वासनानुसार लोकांना अच्छे दिन पाहायला मिळालेच नाही.अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.शरद पवार दि.२९ रोजी ठाणे जिल्हाच्या दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत बोलत होते.त्यावेळी त्यांनी भाजपाने आत्तापर्यंत दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचून केंद्रावर निशाणा साधला.
शरद पवार पुढे म्हणाले की,भाजपाने २०१४ साली अच्छे दिन येणार ची घोषणा केली होती परंतु आज पावेतो कुठलेही अच्छे दिन कोणालाही पाहायला मिळालेले नाही.देशातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ई-प्रणाली सुरु करण्याचे आश्वासन निवडणुकीच्या वेळी दिले होते.ते आजही अपूर्ण आहे.आजही देशभरात काही ठिकाणी शौचालय नसल्याने ते पूर्णत्वाकडे नेण्याची गरज असुन महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत.आजपर्यंत बहुतेक आश्वासन पूर्ण झालेले नसून जी आश्वासन देण्यात आली ती पाळली गेली नाही अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.