पालकमंत्री गुलाबराव पाटील तीन महिन्यांच्या बाळाला घाबरले-सुषमा अंधारे यांचा टोला
मी दहशतवादी आहे की गुंड?नजरकैदेत ठेवल्यावरून सुषमा अंधारे यांचा राजकारणी व पोलिसांना प्रश्न
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आपल्या करारी बाण्याने आणि आक्रमक वाणीने बंडखोरांविरोधात गेल्या महिनाभरापासून रान पेटविणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मुक्ताईनगरच्या सभेआधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सुषमा अंधारे यांना सभास्थळी जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आहे.के प्राईड हॉटेलमधून त्या सभास्थळी जाण्यास निघाल्या तत्पूर्वी शेकडो पोलिसांनी त्यांच्या गाडीला वेढा देऊन त्यांना सभास्थळी जाता येणार नसल्याचे सांगितले यानंतर सुषमा अंधारेंचा चांगलाच पारा चढला मी दहशतवादी आहे की गुंड? माझा नेमका गुन्हा काय आहे?माझा गुन्हा सांगा आणि मग मला ताब्यात घ्या असा आक्रमक पवित्रा घेऊन त्यांनी दमनशाहीचा निषेध व्यक्त केला यावेळी त्यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही झोडपून काढले.शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखालील महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे.मुंबई आणि ठाण्यात पहिल्या टप्प्यात सुषमा अंधारे यांनी बंडखोरांवर कडाडून हल्ला चढवत त्यांची पिसे काढली त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरु असताना आज मुक्ताईनगरच्या सभेआधी अंधारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगत पोलिसांनी अंधारे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले. युवासेनेचे नेते शरद कोळी यांच्यावर जिल्हाबंदीची कारवाई केल्यानंतर आज उपनेत्या अंधारे यांनाही नजरकैदेत ठेवल्याने शिवसेनेच्या (ठाकरे गट) गोटात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की,या कारवाईचा मी निषेध व्यक्त करते.माझा गुन्हा काय तो पोलिसांनी सांगावा?मी गुंड आहे की दहशतवादी? मला ताब्यात घेण्यासाठी ५०० पोलिसांनी माझ्या गाडीभोवती गराडा घातला आहे ही दमनशाही आहे ही दमनशाही आम्ही सहन करणार नाही आम्ही त्यांना तोडीस तोड उत्तर देऊ..पण जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मी त्यांच्यात इलाक्यात जाऊन त्यांनाच ललकारते आहे.कुछ तो बात हैं ना मुझ में..”, असे सांगत गुलाबराव तीन महिन्यांच्या बाळाला घाबरले असा टोला त्यांनी लगावला आहे.