Just another WordPress site

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन

हिमाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

स्वतंत्र्य भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले.हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील मूळ रहिवाशी असलेल्या नेगी यांचे वय १०६ वर्ष होते.दरम्यान २ नोव्हेंबर रोजीच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले होते.श्याम सरल नेगी यांनी आत्तापर्यंत ३३ वेळा मतदान केले आहे.बॅलेट पेपर ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी अनुभवला आहे.२ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पोस्टल मतदान केले होते तेच त्यांचे शेवटचे मतदान ठरले.श्याम सरण नेगी यांनी अलीकडेच मतदानासाठीचा १२-डी फॉर्म परत केल्यामुले चर्चेत आले होते.प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे फॉर्म परत केले होते मात्र त्याचदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी पोस्टल मतदान केले.

भारताचे पहिले मतदार म्हणून नेगी यांनी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्यांदा मतदान केले होते.हिमाचल प्रदेशच्या किन्नोर जिल्ह्यातील एका शाळेतल्या मतदान केंद्रात जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.स्वातंत्र्यानंतर देशात लोकसभेसाठी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्यांदा मतदान झाले.या मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावणारा पहिला मतदार अशी त्यांची नोंद झाली आणि देशाचे पहिले मतदार म्हणून इतिहासाने त्यांची दखल घेतली.अशा या स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम नेगी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.