Just another WordPress site

काँग्रेसचे २२ आमदार फुटणार? ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा

औरंगाबाद-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे त्यातच आता काँग्रेसचेही २२ आमदार फुटणार असे मोठे विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकदा राजकीय भूकंप होतो का ?अशा चर्चाना उधाण आले आहे.औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना खैरे यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल मात्र फडणवीस हे हुशार माणूस आहेत त्यांनी सरकार पडेल म्हणून काँग्रेसचे २२ आमदार आधीच तयार करून ठेवले आहेत आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून त्यांनी हे केले आहे असे ते म्हणाले.

दरम्यान खैरे यांच्या या दाव्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याना विचारले असता त्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे उलट ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही असा टोला नाना पटोले यांनी खैरे यांना लगावला आहे.खैरे यांच्या विधानामुळे आता काँग्रेस-शिवसेना यांच्यात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.