Just another WordPress site

देवेन्द्रजी सर्व कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार तुम्ही आहात-शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

मुक्ताईनगर येथील सभेला बंदी म्हणजे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या विरोधात मी न्यायालयात अपील करणार आहे.गुलाबराव पाटील म्हणतात लोक आमच्या पाठीशी आहेत जर लोक त्यांच्या पाठीशी आहेत तर वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरण्याची गरज काय?गुलाबराव किती घाबरता रे तुम्ही मला.माझ्याकडे शस्त्र नाहीये..राजकीय वारसा सुद्धा नाही अजून..आणि पन्नास खोके तर बिलकुल नाही…माझ्याकडे सत्ता नाही माझ्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही..माझ्याकडे वाळूचे ठेके नाहीत..माझ्याकडे गावठी दारूचे अड्डे नाहीत…गुलाब भाऊ माझ्याकडे कोणताही दोन नंबरचा पैसा नाही मी कष्टाची भाकरी खाते असा टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

गुलाबराव मुक्ताईनगरची सभा न झाल्यामुळे गिरीश महाजन यांचा फायदा झाला किशोर आप्पांचा अभ्यास घेतला चिमणराव पाटलांचा अभ्यास घेतला तुमचा तर चिकार अभ्यास झाला हो..गिरीश महाजन सभेतून सुटू नये असे प्रामाणिकपणे मला वाटते यासाठी मी त्यांची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा काढून ठेवली होती सभा झाली असती तर मी ती स्क्रीनवर दाखवणार होते…या व्हिडिओमध्ये स्टेजवर गिरीश महाजन ना कोणीतरी मारताय…मात्र गिरीश भाऊ तुम्ही गुलाबभाऊंचे आभार माना की त्यांच्यामुळे मुक्ताईनगरची सभा होऊ शकली नाही असे अंधारे म्हणाल्या.मी चिथावणीखोर बोलते असा आरोप करतात.मग महिलांविषयी अश्लील भाषेत वर्तन करणाऱ्या संभाजी भिडेंवर कुठलीही कारवाई होत नाही.संतोष बांगर यांनीही अरेरावी करत पोलिसाना शिवीगाळ केली.मात्र देवेंद्रजी संतोष बांगर यांच्या विरोधात ही आपण काहीच ॲक्शन घेतली नाही.गुलाबराव पाटलांची एवढीही हिंमत नाही मात्र देवेंद्रजी तुम्ही त्यांना अभय दिला आहे त्यामुळे ते असे करतात असे अंधारे यांनी म्हटले आहे.देवेंद्रजी तुम्ही संविधानाची शपथ घेतली असेल मात्र तुम्ही संविधान मानत नाहीत.माझ्याबद्दलच आकस बुद्धी का? माझ्याबद्दल तुमच्या मनात ममत्व भाव नाही मग संतोष बांगर,संजय गायकवाड,संभाजी भिडे,नारायण राणे असतील..राणेंची दोन बारकी बारकी मुले असतील…या सर्वांबद्दलच ममत्व भाव कसा?असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

देवेंद्रजी तुमचे भाजपचे लावारिस मंद भक्त आहे ना…टॅक्स पेयरबद्दल बोलत असतात…त्यांच्यासाठी सांगते की होय मी टॅक्स पेयर आहे.मी आरक्षणाची लाभार्थी नाहीये आतापर्यंत कुठलेही जात प्रमाणपत्र न दाखवता सर्व शिक्षण घेतले आहे.देवेंद्रजी हे सर्व मी तुम्हालाच का बोलते आहे?कारण या सर्व कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार तुम्ही आहात म्हणून…देवेंद्रजी मी फक्त प्रश्न विचारते आहे.त्या प्रश्नांची उत्तर का मिळत नाही. गुलाबराव पाटील म्हणाले पाणीवाला बाबा बनायचय म्हणाले..मी म्हटल लोगो को पानी कब मिलेगा..की शाम को छह बजे के बाद में ग्लास मे डालने को मीलेगा..पाचोऱ्यात शासकीय जागांच डी रिझर्वेशन..असेच प्रश्न विचारते, अस त्या पुढे म्हणाल्या.बहीण म्हणून किरीट भाऊंना विनंती आहे…किरीट भाऊ तुम्ही किशोरी पेडणेकर यांची चौकशी करा..त्या प्रामाणिक आहेत.आम्हाला माहित आहे मात्र तुम्ही बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी झालेल्या खर्चाची का चौकशी करत नाही?किरीट भाऊ तुमची ईडीच्या कार्यालयात चांगली ओळख आहे त्यामुळे मला तुमच्यासोबत घेऊन चला व माझी मदत करा…किरीट भाऊ मी फक्त मदत मागते तरीसुद्धा तुम्हाला आणि देवेंद्रजींना का राग येतोय?अस म्हणत अंधारे यांनी टोला लगावला.

सत्तांतराच्या वेळी मुंगटीवार म्हणाले होते…आमचा या घटनाक्रमाशी संबंध नाही तर चंद्रकांत दादा म्हणाले होते आम्ही छातीवर मोठा दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले मात्र एकनाथ शिंदे स्वतः सभागृहात म्हणाले हे सगळे घडवणारा कलाकार म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत.देवेंद्रजी बच्चू कडूंना बदनाम करायचा डाव कोणी आखला आहे त्यांना मंत्रिपद द्यायचे नाही म्हणून तुम्ही हा डाव आखला आहे ना हे लोकांना कळत नाहीये का?आमदार रवी राणा हे बच्चू कडूंना बदनाम करणारे स्टेटमेंट वारंवार का करतात त्यामुळे देवेंद्रजी आमदार रवी राणा यांच्या सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव तुम्ही का मांडत नाही?असा सवाल अंधारेंनी केला.बाई म्हणून माझ्यावर अन्याय झाला असे मी म्हणणार नाही कारण या ठिकाणी बाई पुरुष नसतो तो फक्त शिवसैनिक असतो.मी अबला नारी असे सुद्धा म्हणणार नाही असे प्रश्न मी तुम्हाला विचारते आहे आणि प्रश्न विचारल्यावर तुम्ही माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहात.माझ्यावर दमन यंत्रणा वापरतात. माझ्यावर कुठला आरोप नाहीये.माझी कुठली तक्रार नाहीये,तरीही मला पाच तासांपासून कुठेही जाऊ दिले नाही.मला नजर कैदेत ठेवले, असा आरोप अंधारे यांनी केला.

देवेंद्र जी कोणत्या काळात जगताहेत..असे कुठे कोंबडे झाकून ठेवल्यावर सूर्य उगवायचा राहतो का हो…माझी सभा होऊ दिली नाही म्हणून काय फरक पडतो मात्र ऑनलाइन सभेला हजारो लोक मला ऐकत आहेत प्रत्येक गद्दाराच्या मतदारसंघात महाप्रबोधन यात्रा जाईल आणि नुसतच व्याज नाही तर चक्रवाढ व्याजासहित हिशोब चुकता केला जाईल असा इशारा अंधारे यांनी दिला आहे.तुम्ही काय रडीचे डाव खेळता हो..कधी ऋतुजा लटके यांचा जामीन अर्जच तुम्ही स्वीकारत नाही तर किशोरी पेडणेकर यांना तुम्ही हैराण करतात.कधी बहुजन नेत्या पंकजा मुंडे यांचा तुम्ही गेम करू पाहता.हा तुमचा महिलाविरोधी दृष्टिकोन आहे.भाजपाचा ईसपी आहे. देवेंद्रजी..तुमची पितृसत्ताक व पुरुष सत्ताक जी सो कॉल्ड व्यवस्था आहे.कुणालाच कळत नाही..तुमचे सर्व समज मी खोटे ठरवते. चित्राताई तुम्ही माझा जातीयवादी दृष्टिकोन दाखवता. प्रताप सरनाईक तुम्ही माझ्या जातीवरून कोट्या करतात..अरे कसला जातीवादी दृष्टीने तुम्ही दाखवता.किती मनुवादी लोक आहात अशी टीका अंधारे यांनी केली.
सुषमा अंधारेच्या जातीवरून खोट्या करण्यापेक्षा,सुषमा अंधारेला ट्रोल करण्यापेक्षा,सुषमा अंधारेला नजर कैदेत ठेवण्यापेक्षा,सुषमा अंधारेला तीन महिन्यांचे बाळ म्हणण्यापेक्षा सुषमा अंधारे आणि तिकडे होती आधी इकडे आहे हे म्हणण्यापेक्षा…तुम्ही काहीही बोललात तरी मूळ प्रश्न हे अनुत्तरीतच राहत आहेत.थोडीशी अस्वस्थ झाली होती.माझा थोडासा बीपी कमी झाला होता कारण माझे कुटुंबातील लोकही टीव्ही बघत असतील माझे पाच वर्षांचे बाळ आहे,टीव्ही बघत असेल त्यामुळे माझे पाच वर्षांचे बाळ घाबरला असेल का या विचाराने मी थोडीशी डगमगली.आई म्हणून थोडसे काही हलल.पण इतक्या सहजासहजी हार मानणारी सुषमा अंधारे नाही असे त्यांनी ठणकावले.

उद्धव ठाकरे यांना आम्ही आमचा कुटुंबप्रमुख,आमचा भाऊ,आमचा पाठीराखा मानतो तर त्यांच्यासाठी शिवसेना वाचवण्यासाठी सुषमा अंधारे कटिबद्ध आहे.मी फार गरीब आहे पण माझ्याकडे इमानदारी आहे.माझ्याकडे गद्दारी विरुद्ध खुद्दारीचा जलवा आहे.ताकद आहे.हा नुर आहे आणि मी लढणार आहे.मै बचुंगी..मै लढुंगी..मैं जितूंगी..हर हाल मे जितूंगी देवेंद्रजी २०२४ ला…या महाराष्ट्राच्या विधानभवनावर पुन्हा भगवा फडकेल.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी आरूढ करण्यासाठी सुषमा अंधारे दिवस रात्र करायला तयार आहे.जीवाचे रान करायला तयार आहे असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.